केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची ट्विटद्वारे माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकातील विधानसभेची निवडणूक जवळ येत असतानाच केंद्र सरकारने राज्यातील महामार्गांच्या विकासासाठी निधी जाहीर केला आहे. राज्यातील 6 महामार्गांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 3,582 कोटी रुपये अनुदान दिले आहे. त्यांनी बुधवारी ट्विटरवर ही माहिती दिली. अनुदान मंजूर झालेल्या महामार्गांमध्ये कनमडी-बिज्जरगी-तिकोटी या राज्यमार्गाचा समावेश आहे. महामार्गांच्या विकासाकरिता अनुदान मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
विजापूर जिल्ह्यातील कनमडी-बिज्जरगी-तिकोटा दरम्यानच्या दुपदरी मार्गाच्या रुंदीकरणासाठी 196.05 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर मार्ग महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने दोन्ही राज्यातील लोकांना यामुळे अनुकूल होणार आहे.
बागलकोट जिल्ह्यातील एन. एच.-367 वर सर्जापूरपासून पट्टदकलपर्यंत दुपदरी मार्गाच्या रुंदीकरणासाठी 445.62 कोटी रु., कोप्पळ आणि गदगमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.-367 वर ग•नकेरी विभागात कुकुकूर, यलबुर्गा, गंजेंद्रगड येथे बायपास निर्माण योजनेसाठी 333.96 कोटी रु., म्हैसूर जिल्ह्यातील कुशालनगर बायपासजवळ गु•sहोसूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.-275 च्या चौपदरीकरणासाठी 909.86 कोटी रु. आणि बेंगळूरमधील यळवाल-के. आर. नगर रोड जंक्शनजवळील महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी अतिरिक्त 739.39 कोटी रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आले आहे.