आधारकार्डवर पित्याच्या रकान्यात सुधीर भाईंचे नाव
364 मुले आणि वृद्धांच्या आधार आणि मतदार ओळखपत्रावर पित्याच्या स्वरुपात उज्जैनच्या सुधीर भाई यांचे नाव नोंद आहे. यातील कुणाला त्यांनी कचऱयाच्या कुंडीतून उचलून आणले आहे. तर कुणाला साखळदंडांमधून मुक्त करविले आहे. आजारपणामुळे कुटुंबीयांनीच वाऱयावर सोडलेल्या लोकांना सुधीर भाईने आपलेसे केले आहे. हे सर्वजण सुधीर भाई यांनाच वडिल मानतात.
ही अनोखी कथा उज्जैनपासून 18 किलोमीटर अंतरावरील अंबोडिया येथील सेवाधाम आश्रमाचे संचालक सुधीर भाई गोयल यांची आहे. या विशाल परिवारातील 90 टक्क्यांहून अधिक जण दिव्यांग आहेत. हे सर्वजण सुधीर भाई यांना वडिलांसारखा आदर आणि प्रेम देतात.
मानसिक स्थिती बरी नसलेल्या एका व्यक्तीला गावात 10 वर्षांपर्यंत साखळदंडांमध्ये बांधून ठेवण्यात आले होते. 2007 मध्ये सुधीर यांनी त्याची कैदेतू मुक्तता केली आणि तो आता 14 वर्षांपासून सेवाधाममध्ये राहत आहेत. गोशाळेत गोसेवक म्हणून तो काम पाहत आहे.
3 वर्षांचा एक मुलगा स्वतःच्या पायांवर उभा राहू शकत नव्हता. पण आश्रमात आल्यावर फिजियोथेरपी, नैसर्गिक चिकित्सा तसेच गोमुत्राच्या मसाजनंतर आता तो शर्यतीत भाग घेतोय. 2006 मध्ये जन्मानंतर जंगलात फेकण्यात आलेल्या मुलीला सेवाधाम आश्रमाने स्वीकारले. ही मुलगी आता 15 वर्षांची झाली असून डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न आहे. अशी अनेक मुलेमुली तसेच वृद्ध आश्रमाचा भाग ठरले आहेत.