सलामीवीर पृथ्वी शॉचेही धमाकेदार अर्धशतक, आंद्रे रसेलचे 2 बळी, कोलकाताविरुद्ध 18 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ शारजा
श्रेयस अय्यरने अवघ्या 38 चेंडूत नाबाद 88 धावांचा झंझावात साकारल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल साखळी सामन्यात केकेआरविरुद्ध 18 धावांनी विजय साकारला. प्रारंभी दिल्लीने 20 षटकात 4 बाद 228 धावांचा डेंगर रचला. श्रेयसच्या खेळीत 7 चौकार व 6 उत्तूंग षटकारांचा समावेश राहिला. तत्पूर्वी, सलामीवीर पृथ्वी शॉने देखील 41 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांसह 66 धावांची आतषबाजी केली. शारजाच्या छोटय़ा मैदानाचा दिल्लीच्या फलंदाजांनी पुरेपूर लाभ उठवल्याचे धावफलकातून प्रतिबिंबित झाले.
प्रत्युत्तरात केकेआरला 20 षटकात 8 बाद 210 धावांपर्यंत पोहोचता आले. इयॉन मॉर्गन (18 चेंडूत 44) व राहुल त्रिपाठी (16 चेंडूत 36) यांनी 7 व्या गडय़ासाठी 78 धावांची भागीदारी साकारत एकच खळबळ उडवून दिली. पण, त्यांचे प्रयत्न पुरेसे ठरले नसल्याचे नंतर स्पष्ट झाले.
दिल्लीची फटकेबाजी
प्रारंभी, कोलकाता नाईट रायडर्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. पण, हा निर्णय त्यांच्यावरच उलटल्याचे नंतर अधोरेखित झाले. अर्धशतकवीर पृथ्वी शॉने धवनसमवेत 5.5 षटकात 56 धावांची सलामी दिली. धवनने 16 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांसह 26 धावांचे योगदान दिले. त्यानंतर तिसऱया स्थानावर उतरलेल्या अय्यरने खऱया अर्थाने तुफानी फटकेबाजी सुरु केली. चौथ्या स्थानावरील ऋषभ पंतने देखील छोटय़ा मैदानावर जोरदार फटके लगावत 17 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले.
स्टोईनिस लवकर बाद झाला. पण, तोवर दिल्लीने मजबूत धावसंख्या रचण्यात उत्तम यश प्राप्त केले होते. केकेआरतर्फे आंद्रे रसेलने 29 धावात 2 तर चक्रवर्ती वरुण, कमलेश नागरकोटी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ झे. शुभमन, गो. नागरकोटी 66 (41 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार), धवन झे. मॉर्गन, गो. वरुण 26 (16 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), श्रेयस अय्यर नाबाद 88 (38 चेंडूत 7 चौकार, 6 षटकार), ऋषभ पंत झे. शिवम मावी, गो. रसेल 38 (17 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), स्टोईनिस झे. वरुण, गो. रसेल 1 (3 चेंडू), हेतमेयर नाबाद 7 (5 चेंडूत 1 षटकार). अवांतर 2. 20 षटकात 4 बाद 228.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-56 (धवन, 5.5), 2-129 (शॉ, 12.4), 3-201 (पंत, 17.5), 4-221 (स्टोईनिस, 19.1).
गोलंदाजी : पॅट कमिन्स 4-0-49-0, शिवम मावी 3-0-40-0, चक्रवर्ती वरुण 4-0-49-1, सुनील नरेन 2-0-26-0, आंद्रे रसेल 4-0-29-2, कमलेश नागरकोटी 3-0-35-1.
केकेआर : शुभमन गिल झे. पंत, गो. मिश्रा 28 (22 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), सुनील नरेन त्रि. गो. नोर्त्जे 3 (5 चेंडू), नितीश राणा झे. बदली खेळाडू (अक्षर पटेल), गो. हर्षल पटेल 58 (35 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार), आंद्रे रसेल झे. नोर्त्जे, गो. रबाडा 13 (8 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), दिनेश कार्तिक झे. धवन, गो. हर्षल पटेल 6 (8 चेंडू), इयॉन मॉर्गन झे. हेतमेयर, गो. नोर्त्जे 44 (18 चेंडूत 1 चौकार, 5 षटकार), पॅट कमिन्स झे. हर्षल पटेल, गो. नोर्त्जे 5 (4 चेंडूत 1 चौकार), राहुल त्रिपाठी त्रि. गो. स्टोईनिस 36 (16 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), कमलेश नागरकोटी नाबाद 3 (3 चेंडू), शिवम मावी नाबाद 1 (3 चेंडू). अवांतर 13. एकूण 20 षटकात
8 बाद 210.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-8 (नरेन, 1.2), 2-72 (शुभमन, 8.1), 3-94 (रसेल, 9.5), 4-117 (नितीश राणा, 12.4), 5-117 (दिनेश कार्तिक, 12.5), 6-122 (कमिन्स, 13.3), 7-200 (मॉर्गन, 18.3), 8-207 (राहुल त्रिपाठी, 19.2).
गोलंदाजी : कॅगिसो रबाडा 4-0-51-1, नोर्त्जे 4-0-33-3, अश्विन 2-0-26-0, स्टोईनिस 4-0-46-1, हर्षल पटेल 4-0-34-2, अमित मिश्रा 2-0-14-1.