फोंडा पालीकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांचे उपाययोजना राबविण्याचे आदेश
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा तालुक्यात डेंग्य़ूच्या रूग्णामध्ये झपाटय़ाने होत असलेल्या वाढीच्या अनुषंगाने फोंडा पालीकेचे नगराध्यक्ष रितेश रवी नाईक यांनी वैद्यकीय अधिकाऱयासमवेत नुकतीच तातडीची बैठक घेतली. वाढत्या रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी गांभीर्याने लक्ष घालून त्वरीत उपाययोजना पालीका व पंचायतीच्या सहाय्याने करण्यात याव्यात अशा सुचना वैद्यकीय अधिकाऱयांना दिल्या. काल सोमवारी दुपारी फोंडा पालीकेत ही बैठक घेण्यात आली.
यावेळी फोंडा पालीकेचे मुख्याधिकारी योगीराज गोसावी, नगरसेवक आनंद नाईक, फोंडा उपजिल्हा इस्पितळाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर, डॉ. जयश्री मडकईकर व पालीका अधिकारी उपस्थित होते. फोंडा तालुक्यात एकूण 38 डेंग्यूचे संक्रिय रूग्ण सापडलेले आहेत. वेगाने वाढणाऱया डेंग्यूच्या रूग्णाबाबत फोंडा तालुक्यातील ग्रामिण भागाच्या तुलनेत शहरातील नागरिक सतर्क असल्याचे चित्र दिसत आहे.
फोंडा शहर परिसरात केवळ 5- रूग्ण, दत्तगड बेतोडय़ात 29 रूग्ण
15 प्रभागाच्या फोंडा पालीका परिसरात केवळ नाममात्र 5-6 रूग्ण आहेत. मात्र त्याच्या सहापटीने जास्त रूग्ण शहरालगतच्या पंचायत क्षेत्रात आढळत आहेत. बेतोडा पंचायत क्षेत्रातील दत्तगड-बेतोडा हा डेंग्यूच्या डांसाच्या पैदासीसाठी हॉटस्पॉट ठरलेला आहे. फोंडा उपजिल्हा अधिकाऱयाच्या मार्गदर्शनाखाली रूग्ण आढळलेल्या परिसरात फॉगिंगची फवारणी करण्यात आलेली आहे. आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेत दाटीवाटीने घरे असलेल्या कुर्टी फोंडा येथील दीपनगर, बाबल्याखळी, तळे दुर्गाभाट, दत्तगड, आशेवाडा या भागात भेट देत पाहणी करावी अशा सुचना यावेळी नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी केल्या. दत्तगड भागात बहुतेक बिगरगोमंतकीयांच्या वस्ती थाटलेल्या आहेत. काही ठिकाणी सोकपिटची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी थेट गटारात सोडण्यात आलेले आहेत. तसेच या भागात नळ कोरडे पडत असल्यामुळे पाण्य़ाची साठवणूक मोठय़ा प्रमाणात उघडया बॅरेलद्वारे करण्यात येत असल्यामुळे डांसाची पैदास होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
रोगराईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य खाते कंबर कसत असल्याची माहिती डॉ. जयश्री मडकईकर यांनी दिली. सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी झटावे असे आवाहन केले आहे. पंचायत मंडळानेही गांभीर्याने लक्ष घालून आपला प्रभाग स्वच्छ ठेवल्यास रोगराईवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल असे डॉ. मडकईकर म्हणाल्या. फेंडा पालीकेतर्फे शहरात स्वच्छता राखण्यासाठी खास ‘स्वच्छता मोहुआ’ ऍपचे अनावरण करण्यात आलेले आहे. सर्व नागरिकांनी कचरा उचलण्यासाठी या ऍपचा वापर करावा असे आवाहन नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी केले आहे.