Tarun Bharat

एका सेल्फीचे 14 हजार भेटण्यासाठी 38 हजार

Advertisements

प्रसिद्ध अभिनेत्रीचे चाहत्यांसाठी नियम

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आता आपण चाहत्यांना स्वतःसोबत रस्त्यांवर चालता-फिरताना मोफत सेल्फी काढू देणार नसल्याचे जाहीर केले आहे. तर संभाषण किंवा सेल्फीसाठी चाहत्याकडून 14 हजारांपासून 38 हजार रुपये वसूल करणार असल्याचे या अभिनेत्रीने म्हटले आहे.

या अभिनेत्रीचे नाव एमिलिया क्लार्क आहे. गेम ऑफ थ्रोन्स फेम एमिलियाची भेट घेत संभाषण करू पाहणाऱया चाहत्यांना यासाठी समारे 38 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. तर ड्रीम इट फेस्ट फॅन कन्व्हेंशनदरम्यान ज्या लोकांना तिच्यासोबत छायाचित्रे काढून घ्यायची आहेत, त्यांना 14 हजार रुपये खर्च करावे लागतील.

एमिलिया क्लार्क ‘मीट अँड ग्रीट’ ट्रेंडध्ये सामील होणार आहे. सुरन जोन्स, सोफी रुंडल यांनी यापूर्वीच बर्मिंगहम फॅन कॉन्फरन्सदरम्यान स्वतःसोबत सेल्फी घेण्यासाठी सुमारे 9 हजार रुपये घेणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.

2017 च्या एका कन्व्हेंशनदरम्यान शेरलॉक स्टार  बेनेडिक्ट कंबरबॅचने चाहत्यांसोबत 3 हजार छायाचित्रे काढून घेत सुमारे 2 कोटी 30 लाख रुपये कमाविले होते. एमिलियाने मागील 2 वर्षांमध्ये सुमारे 72 कोटी कमाविले आहेत. गेम ऑफ थ्रोउन्समध्ये डेनेरीस टायगॅरियनच्या भूमिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेचा लाभ एमिलियाने स्वतःची परफॉर्मिंग आर्ट्स कंपनी सिनिक रुटद्वारे उचलला आहे. या कंपनीची स्थापना 2014 मध्ये झाली होती. 2019 पासून एमिलिया मोठय़ा पडद्यावर दिसून आलेली नाही.

Related Stories

‘सांगते ऐका’ मध्ये सोनालीबद्दल न ऐकलेल्या गोष्टी

Omkar B

शूटिंगसाठी लडाखला जाणार क्रीति सेनॉन

Patil_p

‘दिल है ग्रे’चे पोस्टर उर्वशीकडून प्रसारित

Patil_p

‘अन्य’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

tarunbharat

प्रियांकाच्या ‘मॅट्रिक्स 4’चा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

वंध्यत्वावर मात…‘पंचकर्म’द्वारे

Patil_p
error: Content is protected !!