सर्वसाधारण घरांपेक्षा 30 टक्के अधिक स्वस्त
अमेरिकेतील एक स्टार्टअप कंपनी एजुरेने 24 तासांत 3डी प्रिंटेड घर तयार केल्याचा दावा केला आहे. या घराची किंमत सामान्य घरांच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी आहे. हे घर रिसायकल होणाऱया प्लास्टिकद्वरो 3डी प्रिंट केले जात आहे. कंपनीने पूर्णपणे टिकावू आणि सुंदर डिझाइनमध्ये 3डी प्रिंटेड एडीयू तयार केला आहे. एक परिपूर्ण गेस्ट हाउस आहे. यात अतिरिक्त लिव्हिंग स्पेस असून त्याची गरज आता प्रत्येकालाच असल्याचे एजुरने ट्विट करत म्हटले आहे.
जगात प्रदूषण वाढण्यासाठी जबाबदार 11 टक्के कार्बनचे उत्सर्जन बांधकाम कंपन्यांमुळे होते. हीच गोष्ट विचारात घेत टिकावू 3डी प्रिंट प्रीफॅब घर तयार करण्याची कल्पना समोर आली. यात पुनर्वापर होऊ शकणाऱया प्लास्टिकचा वापर केला जातो. बांधकाम क्षेत्र कच्चा मालाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. याचमुळे आम्ही आगामी पिढीसाठी टिकावू उत्पादन तयार करत आहोत असे उद्गार एजुरेचे सीईओ रोस मेगुएरे यांनी काढले आहेत.
प्लास्टिक 3डी प्रिंटेड स्टुडिओ आणि ऍक्सेसरी डय़ूलिंग युनिटला ऑर्डरसाठी उपलब्ध करविण्यात आले आहे. कंपनी स्वतःचे उत्पादन वाढविण्याची तयारी करत आहे. हे घर तयार करण्यासाठी 20 लाख रुपयांपर्यंतच खर्च येऊ शकतो असा दावा एका नियतकालिकाने केला आहे. यात सिंगल रुम युनिट मिळू शकते. याला बॅकयार्ड ऑफिस किंवा जिमप्रमाणे वापरले जाऊ शकते. हे युनिट्स प्रीफेबॅरिकेटेडस असतात आणि यात कनेक्टेबल मॉडय़ूलचा वापर केला जातो. म्हणजेच वॉटरप्रूफ प्लास्टिक पॉलिमरने हे तयार झालेले असते असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.