Tarun Bharat

4 नौसैनिकांचे मृतदेह हस्तगत, दोघांचा शोध सुरू

चमोली त्रिशूल पर्वतावरून झाले होते बेपत्ता

वृत्तसंस्था/ जोशीमठ

उत्तराखंडच्या चमोलीमध्ये त्रिशूल पर्वतावर शुक्रवारी झालेल्या हिमस्खलनाच्या तावडीत सापडलेल्या 4 नौसैनिकांचे मृतदेह सापडले आहेत. हे मृतदेह जोशीमठ येथील सैन्याच्या हेलिपॅडमध्ये पोहोचविण्यात आले आहेत. तेथेच शवविच्छेदन करण्यात येणार आहे. तर अद्याप दोन जण बेपत्ता असून त्यांच्याकरता शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

15 सप्टेंबर रोजी गिर्यारोहकांचे पथक त्रिशूल पर्वतासाठी रवाना झाले होते. या पथकात 20 नौसैनिक सामील होते. पण शुक्रवारी हिमस्खलनामुळे 5 नौसैनिक आणि एक शेरपा बेपत्ता झाला. त्यानंतर ग्राउंड रेस्क्यू टीमसोबत हेलिकॉप्टर्स, सैन्य, वायूदल, एसडीआरएफकडून शोध सुरू करण्यात आला.

7,120 मीटर उंची त्रिशूल शिखर चमोली जिल्हय़ाच्या सीमेवर कुमाऊच्या बागेश्वर भागात आहे. हे शिखर सर करण्यासाठी हे पथक जात असतानाच हिमस्खलन झाले आणि याच्या तावडीत 6 जण सापडले. लेफ्टनंटर कमांडर रजनीकांत यादव, लेफ्टनंट कमांडर योगेश तिवारी, लेफ्टनंट कमांडर अनंत कुकरेती आणि एमसीपीओ हरिओम यांचे मृतदेह सापडले आहेत.

भारतीय नौदलाचे लेफ्टनंट जनरल आणि सैन्याच्या लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकारी जोशीमठ येथे पोहोचले आहेत. तर बेपत्ता नौसैनिकांना वाचविण्यासाठी जात असलेल्या गढवाल स्काउटच्या पथकाकरता भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरला सुतोल गावातील शेतांमध्ये उतरविण्यात आले. तेथूनच त्यांना हेलिकॉप्टर्सद्वारे त्रिशूल बेस कँपपर्यंत पोहोचविण्यात आले आहे.

Related Stories

खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन; ‘भारत जोडो यात्रे’त हृदयविकाराचा झटका

datta jadhav

हाँगकाँगला संरक्षण साहित्य अन् तंत्रज्ञानाच्या निर्यातीस अमेरिकेकडून बंदी

datta jadhav

‘या’ राज्यात 4 महिन्यांनंतर आजपासून शाळा सुरू

Tousif Mujawar

काश्मीरसंबंधी जर्मनीने बदलली नाही भूमिका

Patil_p

दीपिकाच्या सिनेमाबाबत भाजपाचा खुलासा, प्रकाश जावडेकर म्हणाले…

prashant_c

“जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्यात…”

Archana Banage