गांधीनगर / वृत्तसंस्था
गुजरातमधील कच्छ भागात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. सोमवारी दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याचे सांगण्यात आले. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजकोटपासून 83 किलोमीटर अंतरावर होता. तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, गेल्या दोन दिवसात वारंवार होणाऱया छोटय़ा-मोठय़ा धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतीय भू-संशोधन संस्थेकडे झालेल्या नोंदीनुसार रविवारपासून या भागात तब्बल 13 धक्के बसले आहेत. मागील आठवडय़ात दिल्ली आणि ग्रेटर नोएडा भागात लहान-मोठय़ा भूकंपाची नोंद झाली होती.