काबूल
अफगाणिस्तानात मंगळवारी सकाळी 6.40 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीनुसार भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्र काबूलपासून 170 किलोमीटर खोलवर होते. या भूकंपामुळे अफगाणिस्तानात कुठल्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. यापूर्वी झालेल्या भूकंपात अफगाणिस्तानात मोठी जीवितहानी झाली होती.