Tarun Bharat

लम्पिस्कीनमुळे मुतग्यातील 4 जनावरे दगावली

पशुपालक शेतकरी चिंताग्रस्त :  पूर्व भागात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या बारावर : पॉलिसी केलेल्यांना भरपाई, न केलेल्यांना फटका

वार्ताहर /सांबरा

तालुक्मयाच्या पूर्व भागामध्ये लम्पिस्कीन आजाराने जनावरे मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरूच असून मुतगा येथे गेल्या चार दिवसांमध्ये गाईसह चार जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱयात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गुरुवार दि. 15 रोजी संभाजी चौक येथील शेतकरी वैजनाथ भाऊ पाटील यांच्या बैलाचा मृत्यू झाला. गांधी गल्ली येथील शेतकरी माणिक कल्लाप्पा बस्तवाड यांचा एक बैल व गाईचा मृत्यू अवघ्या दोन दिवसात झाला. तर चार दिवसांपूर्वी मारुती गल्ली येथील शेतकरी अरुण देसाई यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. चार दिवसांमध्ये गावातील चार जनावरे दगावल्याने पशुपालक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

लस उपलब्ध नसली तरी रोग नियंत्रणासाठी शर्थीचे प्रयत्न

आतापर्यंत पूर्व भागामध्ये लम्पिस्कीन आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या बारावर पोहोचली आहे. या रोगावर अद्याप लस उपलब्ध नसली तरी पशुसंगोपन खात्याच्यावतीने रोग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लागण झालेल्या जनावरांवर पशु संगोपन खात्याच्यावतीने उपचार करण्यात येत आहेत. मागील वषीही या आजाराने डोके वर काढले होते. मात्र त्यावेळी मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी होते. यंदा मात्र लम्पिस्कीन आजाराने जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे यंदा लम्पिस्कीन आजाराचा धोका वाढला आहे. लम्पिस्कीन आजाराचा फैलाव झपाटय़ाने वाढत असून आजूबाजूच्या गावातील जनावरांनाही या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

नुकसानभरपाई देण्याची गरज

लम्पिस्कीन आजाराने जनावरे मृत्युमुखी पडल्याने पशुपालक शेतकऱयांना मोठय़ा प्रमाणावर नुकसान सोसावे लागत आहे. शेतकऱयाला देशाचा कणा संबोधले जाते. मात्र, याच शेतकऱयांवर जेव्हा आर्थिक संकट ओढवते तेव्हा मात्र त्याला नुकसानभरपाई देण्यास कोणीही पुढे सरसावत नाही. वास्तविक पाहता शासनाने शेतकऱयांना विनाविलंब नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष घालून शेतकऱयांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लम्पीने दगावलेल्या जनावरांना विमा पॉलिसीचा आधार

जिल्हय़ात लम्पिस्कीन आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शेकडो जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. तर बेळगाव तालुक्मयातील 12 जनावरे या आजाराने दगावली आहेत. संकट काळात दगावलेल्या जनावरांच्या मालकांना पशुधन विमा
पॉलिसी आधार ठरणार आहे. मात्र काही शेतकऱयांनी याकडे दुर्लक्ष करून जनावरांची विमा पॉलिसी केली नाही. त्यांना मात्र मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

पशुधनाच्या सुरक्षिततेचा विचार करून पशुसंगोपन खात्याने विमा पॉलिसी जारी केली होती. दरम्यान, काही शेतकऱयांनी जनावरांच्या आरोग्याचा विचार करून विमा पॉलिसी केली आहे. आता लम्पिस्कीन आजाराने अनेक जनावरे गंभीर आहेत. तर काही दगावली आहेत. दगावलेल्या जनावरांचा विमा पॉलिसीमध्ये समावेश असल्यास त्यांना संपूर्ण रक्कम मिळणार आहे. मात्र ज्यांनी या विमा पॉलिसीकडे दुर्लक्ष करून जनावरांची पॉलिसी भरली नाही, त्यांना मात्र फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी पुढील काळात येणाऱया संकटाचा विचार करून जनावरांची विमा पॉलिसी भरण्याची गरज आहे.

पशुधन विमा पॉलिसीच्या कालावधीत जनावराचा मृत्यू, आजारपण, अपघात, आग, वीज पडणे, धूर, वादळ आदी कारणांमुळे नुकसान झाल्यास संबंधित जनावराला पॉलिसीमधून रक्कम मिळते. गाय, म्हैस, बैल, शेळय़ा-मेंढय़ा, डुक्कर, गाढव, घोडा आदी जनावरांचा पॉलिसीमध्ये समावेश आहे. त्यामुळे शेतकऱयांनी जनावरांची विमा पॉलिसी भरण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.

जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. शिवाय अलीकडे जनावरांच्या किमती देखील वाढल्या आहेत. जातीवंत जनावर घ्यायचे म्हटल्यास 1 लाख मोजावे लागतात. दरम्यान एखाद्या आजाराने जनावर दगावल्यास मोठा आर्थिक फटका बसतो. अशा कठीण परिस्थितीत ही विमा पॉलिसी शेतकऱयांना आधार ठरते. मात्र ज्यांनी या पॉलिसीकडे दुर्लक्ष केले आहे आणि आता लम्पिस्कीनने जनावर दगावले आहे, त्यांना फटका बसणार आहे.

तालुक्मयात 1 लाख 78 हजार जनावरांची संख्या आहे. मात्र सध्या लम्पिस्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक जनावरे आजारी पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान दगावलेल्या जनावरांची विमा पॉलिसी केलेली असल्यास त्यांना पॉलिसीमधून संपूर्ण रक्कम मिळणार आहे. सध्या विमा पॉलिसीचे काम थांबले असले तरी येत्या महिन्याभरात पुन्हा पशुधन विमा पॉलिसी सुरू होणार आहे. दरम्यान शासनाकडून देखील विम्यामध्ये 50 टक्के अनुदान जाहीर केले जाते.

विमा पॉलिसी करण्याचे आवाहन

संकट काळात पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशावेळी पशुधन विमा पॉलिसी आधार ठरते. मात्र काही दूध उत्पादक शेतकऱयांनी विमा पॉलिसी भरली नाही. पुढील महिन्यापासून पुन्हा विमा पॉलिसी भरून घेतली जाणार आहे. ज्यांनी विमा पॉलिसी भरली आहे आणि जनावर दगावले आहे. त्यांना आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे.

– डॉ. आनंद पाटील (तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)

Related Stories

एलआयसीचा बीमा रत्न प्लॅन सादर

Patil_p

तुरमुरी येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी वेदांत, अवधूतची निवड

Amit Kulkarni

राकसकोप जलाशय भरण्याच्या मार्गावर

Tousif Mujawar

एनसीसीच्या ट्रेकिंग कॅम्पला प्रारंभ

Patil_p

मीटर रिडरने ग्राहकांना लावला चुना

Patil_p