Tarun Bharat

बांधकाम विभागात 4 कोटींचा घोटाळा

चिपळुणातील प्रकार, दोन लिपीकांची करामत,/ महिलेसह 7 जणांना अटक

चिपळूण

 चिपळुणातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा विभागातील दोघा लिपिकांनी संगनमताने ठेकेदारांनी ठेवलेली अनामत रक्कम परस्पर ऑनलाईन पद्धतीने बोगस ठेकेदारांच्या नावे वळवून तब्बल 4 कोटी 8 लाखाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात एका महिलेसह एकूण 7 जणांना चिपळूण प्नेलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गेल्या दोन वर्षापासून सुरु असल्याची माहिती पुढे येत आहे.

   याप्रकरणी जीवन मारूती खंडजोडे (48, मार्कंडी, चिपळूण), प्रतिक प्रमोद भिंगार्डे (30), रजनीश राजेंद्र टाकळे (31), परेश प्रमोद भिंगार्डे (30, तिघेही वालोपे-चिपळूण), संदीप सुरेश आंबुर्ले (35, पेठमाप, चिपळूण), प्रविण दिलीप भिसे (36, काविळतळी, चिपळूण) व अन्य एका महिलेसह पोलिसांनी 7जणांना प्नेलिसांनी अटक केली आहे. याबाबतची फिर्याद चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजीत रामसे यांनी दिली आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा विभागातील व्यवहारात काहीशी अनियमितता असल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर याप्रकरणी  पोलिसाकडे तक्रार देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागात लिपीक म्हणून कार्यरत असलेले जीवन मारूती खंडझोडे व प्रतिक प्रमोद भिंगार्डे यांनी काही मित्र व नातेवाईकांच्या बँक खात्यात ऑनलाईन रक्कम वर्ग केल्याचे पुढे आले. त्यानंतर पुन्हा एक-दोन दिवसांतच या दोघांनीही सदरची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवल्याचा प्रकार पुढे आला. याविषयी खात्री पटताच पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेत अटक केली आहे.

  तसे पाहिल्यास विकासकामांच्या देयकातून सुरक्षा अनामत रक्कम ठेवली जाते. सलग काम करणारे ठेकेदार ही रक्कम काढत नसल्याने ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच तशीच शिल्लक राहत असल्याने याचा फायदा त्या दोघांनी उठवला आहे. याबाबतचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी व पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे करीत आहेत.

Related Stories

जिह्यातील 12 एसटी कर्मचारी बडतर्फ

Patil_p

रत्नागिरी तालुक्यात ‘निसर्ग’ ने उडवली दाणादाण

Patil_p

हळबे महाविद्यालयाच्या ग्रंथालायामार्फत डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी

Anuja Kudatarkar

म्युकरमायकोसीसचा जिल्हय़ात तिसरा बळी

Patil_p

काजू खरेदीसाठी प्रोत्साहन अनुदान योजना जाहीर करावी!

NIKHIL_N

कालव्याचे पाईप जळून कोटय़वधीचे नुकसान

Patil_p