जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ
वृत्तसंस्था/ चित्रकूट
उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे बुंदेलखंड गौरव महोत्सवादरम्यान एका दुकानात सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. सिलिंडरचा स्फोट होऊन चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी आहे. तसेच जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला जिल्हा ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटामुळे सिलिंडर सुमारे 50 फूट उंचीपर्यंत हवेत झेपावला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर तत्काळ ऊग्णवाहिका, अग्निशमन दल आणि जिल्हा प्रशासनाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जिल्हा प्रशासकीय यंत्रणेच्या नेतृत्त्वात मदत आणि बचावकार्य सुरू होते. सिलिंडर स्फोटामुळे आजुबाजुच्या दुकानांना आग लागून त्यांचेही नुकसान झाले.