Tarun Bharat

ट्रक-बस अपघातात झारखंडमध्ये 4 ठार

Advertisements

 65 प्रवाशांनी भरलेली बस ट्रकला धडकली

रांची / वृत्तसंस्था

झारखंडमधील हजारीबाग येथे पर्यटक बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 12 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. कटकमसांडी हजारीबाग रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाली. जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले असून सर्वांवर उपचार सुरू आहेत. बसमधील प्रवासी गयाहून ओडिशाला जात असताना हा भीषण अपघात घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या अपघातप्रकरणी वाहन चालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून अधिक तपास केला जात आहे.

Related Stories

बाजारपेठेला आग, 700 दुकाने खाक

Patil_p

गुर्जर आंदोलन, राजस्थान सरकार सतर्क

Patil_p

संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय!

Patil_p

बृजभूषण यांच्या विरोधानंतर राज ठाकरेंसाठी कांचनगिरींचे पंतप्रधान मोदींना पत्र

Archana Banage

संसदेतील चर्चेचा स्तर दिवसेंदिवस समृद्ध व्हावा : नरेंद्र मोदी

prashant_c

लॉकडाऊन यशस्वीतेची जबाबदारी पालकमंत्र्यांवर

Patil_p
error: Content is protected !!