Tarun Bharat

31 वॉर्डमध्ये 4 लाख 61 हजार मतदार

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची माहिती :आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध :1 जुलैपर्यंत हरकती दाखल करता येणार

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोल्हापूर महापालिका निवडणूकीसाठीची प्रारूप मतदार यादी तयार झाली आहे. आज, गुरूवारी निवडणूक कार्यालय, चार विभागीय कार्यालयासह ऑनलाईनवर यादी उपलब्ध असणार आहे. 31 वॉर्डमध्ये 4 लाख 61 हजार 892 मतदार आहेत. प्रारूप मतदार यादीवर 6 जुनपर्यंत हरकती घेता येणार असून चार ठिकाणी त्या स्विकारण्याची सुविधा केल्या असल्याची माहीती महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

डॉ. बलकवडे म्हणाल्या, 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादीच्या आधारे प्रभाग निहाय मतदारांचे विभाजन करून प्रारूप मतदार यादी केली आहे. आज, गुरूवारी निवडणूक कार्यालय, चारही विभागीय कार्यालयासह महापालिकेच्या वेबसाईटवर मतदार यादी उपलब्ध केली आहे. 1 जुलैपर्यंत हरकती दाखल करता येणार आहे. यादी संदर्भातील हरकतीमध्ये लेखनिकांच्या काही चुका झाल्या असल्यास त्या दुरूस्ती, दुसऱया प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले, संबंधीत प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नांवे असूनही महापालिकेच्या संबंधीत प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नांवे वगळणेत आले असल्यास अशा मतदारांची नांवे मतदार यादीत समाविष्ठ केली जाणार आहे. तर नावात बदल, नवीन नोंदणी करणे, पत्ता दुरूस्ती करणे असे कामे केली जाणार नाही. दुबार मतदार असल्यास एकाच ठिकाणी मतदान करता येणार असल्याचे डॉ. बलकवडे यांनी स्पष्ट केले आहे.

मतदार यादी पाहण्याची ठिकाणे


गांधी मैदान विभागीय कार्यालय, शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय, ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय, महापालिका मुख्य इमारतीमधील जनसंपर्क कार्यालय, ताराबाई पार्क येथील मुख्य निवडणूक कार्यालय, महानगरपालिकेचे संकेतस्थळ.

सर्वाधिक पुरूष मतदार


जनगणना 2011 नुसार महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या 5 लाख 49 हजार 236 इतकी असून 2015 च्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदार संख्या 4 लाख 53 हजार 210 इतकी होती. 31 मे 2022 च्या मतदार यादीनुसार मतदार संख्या 4 लाख 61 हजार 892 आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 2 लाख 32 हजार 57 पुरूष मतदार तर 2 लाख 29 हजार 817 स्त्राr मतदार व इतर 18 मतदार आहेत.

9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर

प्रारूप मतदार यादीवर आज, गुरूवारपासून 1 जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. हरकतीनंतर बीएलओमार्फत शहानिशा करून योग्य असल्यास बदल करून 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. हरकती स्विकारण्यासाठी विभागीय कार्यालयानुसार चार सहायक प्राधिकृत अधिकारी नियुक्त केले आहेत.

प्रभागनिहाय हरकती दाखल करण्याचे नियोजन

विभागीय कार्यालय प्रभाग क्रमांक

गांधी मैदान 21,22,26,27,28,29,31
शिवाजी मार्केट 9,10,11,12,20,23,24,25
राजारामपुरी 13,14,15,16,17,18,19,30
ताराराणी मार्केट 1,2,3,4,5,6,7,8

Advertisements

Related Stories

यड्राव येथील शहापूर लसीकरण केंद्रावर वादावादी

Abhijeet Shinde

Kolhapur; सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटल्यावर संजय पवार झाले भावूक

Abhijeet Khandekar

गगनबावडा तालुक्यातील अवैध धंदे बंद करा

Abhijeet Shinde

भाजपकडून प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

Sumit Tambekar

कोल्हापूर उपनगरात कोरोना लसीकरण केंद्रे सुरू करा

Abhijeet Shinde

चंदेरीनगरी हुपरीचे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!