धारबांदोडा : कुळे येथील यादेन्द्र कवळेकर यांच्या दुकानाला शॉट सर्किटमुळे आग लागून लाखो रूपयांच्या मालमत्तेची नुकसानी झाली. आगीची घटना काल गुरुवारी पहाटे उघडकीस आली. दुकानाला आग लागून आतील संपूर्ण सामान जळून खाक झाले. कुडचडे येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दल घटनास्थळी पोचण्यापूर्वी आतील संपूर्ण सामान जळून खाक झाले होते. या आगीत दोन फ्रिज, फॅन, इलेक्ट्रीक वजनकाटा, सामान ठेवण्याच्या कपाटे तसेच इतर किमती सामान जळून खाक झाले. अंदाजे 4 लाख रूपयांच्या मालमत्तचे नुकसान झाल्याची माहिती मालक यादेन्द्र कवळेकर यांनी दिली.
Previous Articleकसबा बावड्यातील झोपडपट्टी धारकांना न्याय द्या
Next Article पर्वरी उड्डाणपुलाचे काम तात्पुरते बंद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.