Tarun Bharat

अमेरिकेत मागील वर्षी 4 कोटी बंदुकांची विक्री

Advertisements

महिलांकडून सर्वाधिक प्रमाणात खरेदी ः गन खरेदीसाठी नेत्यांकडून प्रोत्साहन

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

अमेरिकेत गन कंपन्यांनी मागील 20 वर्षांमध्ये स्वतःची मोठी बाजारपेठ विकसित केली आहे. वैयक्तिक सुरक्षेसाठी हँडगन आणि तरुणाईला सैन्यासारखी शस्त्रास्त्रs विकण्यावर त्यांचा भर आहे. आत्मरक्षण, स्वाभिमान, पौरुषत्व आणि भीतीच्या भावनेला खतपाणी घालून या कंपन्या गनविक्रीत अत्यंत यशस्वी ठरल्या आहेत. मागील वर्षी या कंपन्यांनी 3 कोटी 89 लाख गन्सची विक्री केली आहे. 2000 साली हा आकडा 85 लाख फायरआर्म्स विकल्या गेल्या होत्या.

सर्वाधिक गन खरेदी करणाऱयांच्या शर्यतीत महिला आघाडीवर आहेत. गननिर्माते, वकील आणि लोकप्रतिनिधींनी अमेरिकेतील एका अत्यंत मोठय़ा वर्गात स्वतःकडे एक गन असावी अशी धारणा निर्माण केली ओ.2012 मध्ये सेंडीहुक शाळेतील हत्यासत्रानंतर बंदुकांची विक्री अत्यंत वेगाने वाढली आहे. गन उद्योगाने 2016 पासून स्वतःच्या खरेदीदारांचा रिकॉर्ड चांगल्याप्रकारे तयार केला आहे. मागील वर्षी एका अध्ययनात सर्वसाधारणपणे बंदूक बाळगणारे बहुतांश लोक 40 वर्षे वयोगटातील श्वेतवर्णीय पुरुष होते आणि त्यांचे हँडगनला प्राधान्य असल्याचे आढळून आले होते.

महिलांची संख्या वाढली

गन इंडस्ट्री असोसिएशननुसार गन खरेदी करणाऱया नव्या लोकांमध्ये उपनगरीय आणि ग्रामीण भागांमध्ये राहणारा वर्ग जोडला गेला आहे. केवळ श्वेतवर्णीय पुरुषच नव्हे तर अश्वेतवर्णीय आणि महिला ग्राहकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

दोन्ही पक्षांचे समर्थन

रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार नॅशनल रायफल  असोसिएशनला समर्थन मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. रिपब्लिकन पार्टीने बंदुकांच्या बाजूने जोरदार मोहीम देखील चालविली आहे. दक्षिण कॅरोलिनामधून खासदाराची निवडणूक लढविणाऱया क्रिस्टिना जेफ्री यांना त्यांच्या एका जाहिरातीत एके-47 रायफनलसोबत दर्शविण्यात आले होते. मिसौरी प्रांताच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत एरिक ग्रीटेन्स एक मशीनगनयुक्त वाहनावर दिसून आले होते. 2018 मध्ये जॉर्जिया गव्हर्नर निवडणुकीत ब्रायर केम्प यांना शस्त्रास्त्रांनी भरलेल्या एका खोलीत पाहिले गेले होते.

महिलांना प्रभावित करणारी जाहिरात

महिलांना प्रभावित करण्यासाठी गन उद्योगाकडून मोहीम राबविली जात आहे. 1996 मध्ये लेडीज होम जर्नल पत्रिकेत एका जाहिरातीत किचनच्या टेबलवर एक बेरेटा हँडगन दाखविण्यात आली होती. तसेच यात ‘होम ओनर्स इंश्योरन्स’ असा संदेश होता. 1960 ते 1990 दरम्यान बहुतांश जाहिराती शिकारीसाठी गनच्या वापरावर पेंद्रीत होत्या. 2009 पासून मात्र स्वरक्षणासाठी शस्त्रसज्ज होण्यावर भर देण्यात येऊ लागला आहे. 2019 मध्ये शिकारीशी संबंधित जाहिराती केवळ 10 टक्क्यांवर आल्या. या बदलासह सेमीऑटोमॅटिक हँडगन आणि एआर-15 रायफल्सची विक्री वाढली. या शस्त्रांचा वापर पोलीस यंत्रणा आणि सैन्याकडून केला जात होता.

Related Stories

नेपाळ विमान दुर्घटनेतील सर्व 22 मृतदेह सापडले

Patil_p

जपानमध्ये 6 महिन्यांत अस्वलांकडून 13 हजार हल्ले

Patil_p

जगातील सर्वात अवघड प्रवेश परीक्षा ‘सुनेयुंग’

Patil_p

अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल

Patil_p

भारताची रॅपिड रिसपॉन्स टीम कुवेतमध्ये

prashant_c

नेदरलँड्स टाळेबंदीत वाढ

Patil_p
error: Content is protected !!