अनाथ मुलीचेही लैंगिक शोषण
वृत्तसंस्था/ हैदराबाद
हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्काराची आणखीन 4 प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांमध्ये 16 वर्षीय अनाथ मुलीवर कारमध्ये बलात्कार झाल्याची घटना देखील सामील आहे. पोलिसांनी याप्रकरणी 23 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. एका घटनेत कॅबचालकासमवेत दोन आरोपींनी 12 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले होते. तसेच रिटेल स्टोअरमध्ये काम करणाऱया मुलीवर बलात्कार झाला आहे. चौथ्या घटनेत आरोपीने एका अल्पवयीन मुलीला चित्रपट दाखविण्याच्या निमित्ताने बोलावून नेत चित्रपटगृहामध्येच बलात्कार केला आहे .यातील तीन प्रकरणांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हैदराबाच्या अनाथाश्रमात राहणाऱया 16 वर्षीय मुलीवर तिच्या ओळखीच्या व्यक्तीनेच बलात्कार केला आहे. ही मुलगी एका मित्राच्या बर्थडे पार्टीत गेली होते. तेथे ओळखीच्या युवकाने मुलीला काही निमित्ताने बाहेर नेत कारमध्ये बलात्कार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार तसेच पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. तसेच आरोपीला अटक केली आहे.
दुसऱया घटनेत एक मुलगी स्वतःच्या आजीच्या घरी जात असताना बेपत्ता झाली होती. एका कॅबचालकाने तिला मित्राच्या घरी नेत तिच्यावर बलात्कार केला होता. पोलिसांनी याप्रकरणी 36 वर्षीय आरोपी शाइक कलीम अली आणि मोहम्मद लुकमान अहमद यजदानी यांना अटक केली आहे.
तिसऱया घटनेत रिटेल स्टोअरमध्ये काम करणाऱया मुलीचे 21 वर्षीय युवक मोहम्मद सुफियानने लैंगिक शोषण केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चौथ्या घटनेत एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने चित्रपटगृहात बलात्कार केला होता.
हैदराबादमध्ये 5 युवकांकडून 17 वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यातील आरोपी हे राजकीय पार्श्वभूमी असलेले आहेत. ही घटना समोर आल्यापासून तेथील राजकारण तापले आहे. अशा स्थितीत आणखीन 4 बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत.