देहरादून
उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यात चंबा येथे झालेल्या भूस्खलनात 4 महिन्यांच्या मुलासमवेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. चारही जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर एक व्यक्ती अद्याप बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेतला जात आहे. भूस्खलनामुळे टिहरी-चंबा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हवामान विभागाने उत्तराखंडमधील 7 जिल्ह्यांकरता अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.