Tarun Bharat

आणखी 4 साप्ताहिक गणपती स्पेशल चाकरमान्यांच्या दिमतीला

मडगाव-पनवेल, पनवेल-रत्नागिरी, उधना-मडगावचा समावेश

प्रतिनिधी/ खेड

गणेशोत्सवातील गर्दी कमी करण्यासाठी आणखी 4 गणपती स्पेशल गाडय़ा जाहीर केल्या आहेत. मडगाव-पनवेल, उधना-मडगाव साप्ताहिक स्पेशलसह पनवेल-मडगाव स्पेशलच्या दोन गाडय़ांचा समावेश असून 25 ऑगस्टपासून आरक्षण खुले होणार आहे. पनवेल-चिपळूण स्पेशल गाडीमुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे.

 01596/01595 पूर्णपणे आरक्षित मडगाव-पनवेल साप्ताहिक स्पेशल 2 ते 9 सप्टेंबरदरम्यान दर शुक्रवारी मडगाव येथून दुपारी 3 वा. सुटून दुसऱया दिवशी पहाटे 5.10 वा. पनवेलला पोहचेल. 4 ते 11 सप्टेंबरपर्यंत दर सोमवारी पनवेल येथून सायंकाळी 4.45 वा. सुटून दुसऱया दिवशी पहाटे 6 वा. मडगाव येथे पोहचेल. या स्पेशलला 20 एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत.

 01591/01592 .पूर्णपणे आरक्षित पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक स्पेशल 3 ते 10 सप्टेंबरदरम्यान दर शनिवारी पनवेल येथून पहाटे 5.40 वा. सुटून 11.45 वा. रत्नागिरी व 3 ते 10 सप्टेंबरला दर शनिवारी रत्नागिरी येथून दुपारी 3.05 वा. सुटून रात्री 10.35 वा. पनवेल येथे पोहचेल.

01193/01194 पूर्णपणे आरक्षित पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक स्पेशल 4 ते 11 सप्टेंबरदरम्यान दर शनिवारी पनवेल येथून रात्री 1.30 वा. सुटून पहाटे 7.30 वा. रत्नागिरी येथे पोहचेल. 4 ते 11 सप्टेंबरला दर रविवारी रत्नागिरी येथून सकाळी 8.30 वा. सुटून सायंकाळी 3.20 वा. पनवेल येथे पोहचेल. 09020/09019 उधना-मडगाव साप्ताहिक स्पेशल 27 व 29 ऑगस्टला उधना येथून सायंकाळी 3.25 वा. सुटून दुसऱया दिवशी सकाळी 9.30 वा. मडगाव येथे पोहचेल. 28 व 30 ऑगस्टला मडगाव येथून सकाळी 10.20 वा. सुटून दुसऱया दिवशी पहाटे 5 वा. उधना येथे पोहचेल. 22 डब्यांची ही स्पेशल वसईमार्गे धावणार आहे.

Related Stories

खात्यातून रक्कम गेली? आता नो टेन्शन…!

NIKHIL_N

लोकार्पणानंतरही तिवरेतील बाधितांचा संसार कंटेनरमध्येच!

Patil_p

जिल्हय़ात ‘भारत बंद’ चा फज्जा

Patil_p

गाळेल येथे अडकलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

NIKHIL_N

कोरोनावर मात करीत पुन्हा रुग्णसेवेत

NIKHIL_N

कोकणात पुन्हा मुसळधारचा इशारा

Patil_p