आयुष्मान नोंदणीत मध्यप्रदेश आघाडीवर ः मोफत उपचार करविण्यात तामिळनाडू पहिल्या स्थानी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत देशातील एकूण 15.88 कोटी लोकांची नोंदणी झाली आहे. यातील 3.61 कोटी लोकांना मोफत उपचारही प्राप्त झाले आहेत. मागील 4 वर्षांमध्ये उपचारावर एकूण 45,781 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत झालेले उपचार अन् खर्चाचा विचार केल्यास राज्यांच्या कामगिरीतील फरक ठळकपणे दिसून येतो. या योजनेच्या अंतर्गत सर्वाधिक 3.11 कोटी लोकांची नोंदणी मध्यप्रदेशात झाली आहे. परंतु उपचाराचा लाभ केवळ 21 लाख लोकांनी घेतला आहे.
तर दुसरीकडे मध्यप्रदेशच्या तुलनेत निम्मी नोंदणी करविणाऱया तामिळनाडूत तीनपट अधिक रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा प्राप्त झाली आहे. तामिळनाडूत एकूण 1.54 कोटी लोक नोंदणीकृत असून यातील 67 लाख लोकांना मोफत उपचार प्राप्त झाले आहेत.
दक्षिणेकडील स्थिती तुलनेत चांगली
दक्षिणेतील राज्यांमध्ये आरोग्याच्या मूलभूत सुविधा तुलनेत अधिक चांगल्या आहेत. तेथील राज्य सरकारांनी योजना प्रभावीपणे लागू केल्याने तेथील कामगिरी उर्वरित राज्यांच्या तुलनेत अधिक चांगली राहिल्याचे असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स इंडियाचे महासंचालक डॉ. गिरधर ज्ञानी यांनी म्हटले आहे.
राज्य नोंदणी रुग्ण रुग्णालय खर्च (कोटींमध्ये)
मध्यप्रदेश 3.11 कोटी 21 लाख 998 3297.64
उत्तरप्रदेश2.19 कोटी 16 लाख 3214 1825.99
गुजरात 1.59 कोटी 33 लाख 2,818 6329.32
छत्तीसगड 1.59 कोटी 30 लाख 1,599 3032.55
तामिळनाडू 1.54 कोटी 67 लाख 4315 5424.48
झारखंड 95.69 लाख 13 लाख 852 1497.83
कर्नाटक 82.99 लाख 35 लाख 3,735 2823.28
पंजाब 79.54 लाख 13 लाख 925 1577.08
महाराष्ट्र 77.58 लाख 7 लाख 1097 1808.89
केरळ 70.29 लाख 39 लाख 746 3483.39
5 राज्यांमध्ये सर्वाधिक अंमलबजावणी
तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगडमध्येच 46 टक्के निधी खर्च झाला आहे. उपचार करविणारे 57 टक्के रुग्ण याच राज्यांमधील आहेत. सर्वाधिक 6,329 कोटी रुपये केवळ गुजरातमध्ये खर्च झाले आहेत. तर तेथे उपचार करविणाऱया रुग्णांची संख्या 33.23 लाख आहे. ही संख्या कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या तुलनेत कमी आहे. तामिळनाडूत 67.34 लाख रुग्णांच्या उपचारावर 5424.48 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
हृदयविकारावर सर्वाधिक खर्च
आजार खर्च (कोटींमध्ये)
हृदयविकार 5,443
कर्करोग 4,584
जनरल मेडिसीन 3,941
जनरल सर्जरी 3,761
ऑर्थोपेडिक 3,551
यूरोलॉजी 2,036
स्त्राr अन् प्रसूती 1,411