Tarun Bharat

वेगवेगळय़ा तीन अपघातात 4 युवक ठार

सारझोरा, चिंचोणे, कुंकळ्ळी येथे अपघात : मृतांपैकी 3 युवक 27 वर्षाखालील,मृतांमध्ये दोन चुलत भावांचा समावेश

प्रतिनिधी /मडगाव

   सारझोरा, चिंचोणे अणि कुंकळ्ळी या तीन ठिकाणी काल सोमवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एकूण 4 युवकांना मृत्यू आला तर एकटा गंभीररित्या जखमी झाला आहे. ठार झालेले तिघेजण 27 वर्षाखालील आहेत तर ठार झालेल्या चैथ्या व्यक्तीचे नाव, गाव अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. 1 जानेवारी 2023 ते आतापर्यंत गोव्यात अपघातात ठार झालेल्यांचा आकडा 23 वर जाण्याची शक्यता आहे.

   दुर्गा – चिंचोणे येथील 19 वर्षीय सायरस पेरैरा, कुल्साभाट चांदर येथील सर्फराज दस्तगीर बेपारी (27) आणि नाझिल अश्पाक बेपारी (23) अशी ठार झालेल्या 3 मयतांची नावे आहेत.

 चिंचोणेत मोटरसायकल चालक ठार

 दुर्गा – चिंचोणे येथील 19 वर्षीय सायरस पेरैरा हा कावासाकी निंजा 300 जातीची दुचाकी घेऊन जात होता तर मूळ झारखंड येथील व सध्या बापोय -चिंचोणे येथे राहता असलेला राजपाल ओरावन हा 24 वर्षीय सायकलस्वार रस्ता ओलांडत होता. मोटरसायकलस्वार चिंचोणेहून असोळणेच्या दिशेने जात होता. चिंचोणे येथील श्री बालाजी हार्डवेअर अॅण्ड प्लायवूड दुकानाजवळ भरवेगात येत असलेल्या दुचाकीस्वाराची जबरदस्त धडक सायकलस्वाराला बसली. झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सायरस पेरैरा आणि सायकलस्वार राजपाल ओरावन दोघेही जखमी झाले. काही वेळातच दुचाकीस्वार सायरस पेरैरा मृत झाला. मडगावच्या सरकारी इस्पितळात दोघांनाही नेण्यात आले तेव्हा सायरस पेरैरा याला ‘मृतावस्थेत आणले’ अशी तेथील डॉक्टरांनी नोंद केली.

 अनैसर्गिक मृत्यू अशी या घटनेची पोलिसानी वर्णन केले असून फौजदारी आचार संहितेच्या 174 कलमाखाली या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

 सारझोरा अपघातात दोघे ठार

 कुल्साभाट – चांदर येथील सर्फराज दस्तगीर बेपारी (27) आणि नाझिल अश्पाक बेपारी (23) हे दोघे रविवारी मध्यरात्रीनंतर (सोमवारी पहाटे) वार्काहून चांदर येथे  दुचाकीवऊन जात होते. गुडी – पारोडा मार्गावऊन जात असताना सारझोरा येथील होली क्रॉस कपेलजवळ दुचाकी चालकाचा वाहनावरील ताबा गेला आणि दुचाकीने रस्त्याच्या बाजुला असलेल्या एका झाडाला जोरदार धडक दिली आणि दोघेही गंभीररित्या जखमी झाले. काही वेळाने दोघांना मडगावस्थित जिल्हा इस्पितळात आणले तेव्हा तेथील डॉक्टरानी मृतावस्थेत आणले अशी नोंद केली.

 सर्फराज, नाझिल चुलत भाऊ

   कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्फराज दस्तगीर बेपारी आणि नाझिल अश्पाक बेपारी हे दोघे चुलत भाऊ. वार्का परिसरात त्यांनी एक हॉटेल चालवण्यास घेतलेले. रात्री उशिरा हे दुकान बंद कऊन गुडी-पारोडा मार्गावऊन ते चांदर येथे घरी परतत असताना हा अपघात झाला. सरकारी इस्पितळात या दोघांना ‘मृतावस्थेत आणले’ अशी नोंद केली.

 तिसरा अपघात कुंकळीला

 तिसरा अपघात सोमवरी रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला कुंकळीच्या कदंब बस स्थानाकाजवळ झाला. या अपघातात जीए-07-के-6785 कमांकाची झेन कार, जीए-09-क्यू-2458 क्रमांकाची यामाहा मोटरसायकल आणि केए-24-एक्स-3635 क्रमांकाची मोटरसायकल गुंतलेली आहे.  पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात एक युवक ठार झाला तर दुसरा गंभीररित्या जखमी झालेला असून त्याला मडगावच्या सरकारी इस्पितळात नेण्यात आलेले आहे. कुंकळीतील अपघातात ठार झालेल्याचे व जखमी झालेल्याचे नाव लगेचच मिळू शकले नाही.

   तीन वेगवेगळ्या अपघातात चार ठार झाल्यामुळे कुंकळळी पोलिसांची दिवसभर  दमछाक झाली. पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी पुढील पोलिस प्रक्रिया झाली. उपनिरीक्षक कविता राऊत, उपनिरीक्षक महेश नाईक, उपनिरीक्षक रविंद्र वेळीप, हवालदार विनोद काणकोणकर, हवालदार सर्वानंद गावकर  यांनी या अपघाती मृत्यूप्रकरणी पोलिसी प्रक्रिया केली. यंदाच्या सुरवातीपासून आतापर्यंत गोव्यात अपघातात ठार झालेल्यांचा आकडा 23 वर जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

तब्बल एका महिन्यानंतर दवाखाना उघडला

Amit Kulkarni

आठ अधिकाऱयांना आयएएस केडरमध्ये बढती

Patil_p

दोड्डा गणेशचा गोवा रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

Amit Kulkarni

पेडणेच्या प्रसिद्ध पुनवेवा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

आमदार चर्चिल आलेमाव विरोधात अपात्रता याचिका

Amit Kulkarni

दोन ‘सरकारी’ लँडमाफिया गजाआड

Amit Kulkarni