Tarun Bharat

40 ग्राम पंचायतींना मिळणार कचरावाहू वाहने

तालुका पंचायतमध्ये वाहने दाखल

प्रतिनिधी / बेळगाव

तालुक्मयातील कचरा निर्मूलनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. छोटेखानी कचरा डेपो उभारण्यासाठी प्रयत्न होत आहेत. कचरा विघटनासाठीही ग्रा. पं. माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकतीच ता. पं. व ग्रा. पं.च्या माध्यमातून कचरा उचल करण्यासाठी कुटुंबाला बकेट देण्यात आली आहे. आता कचरा उचलण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

घरोघरी जाऊन कचरा उचल करण्यासाठी 40 ग्रा.पं.ना वाहने मिळणार आहेत. मात्र, त्या त्या कार्यक्षेत्रातील आमदारांनी हिरवा कंदील दिल्यानंतरच ही वाहने ग्रा.पं.कडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. सध्या ता. पं. कार्यालयासमोर ही वाहने आहेत.

बेळगाव ता. पं. कार्यक्षेत्रात एकूण 57 ग्रा. पं. आहेत. यापैकी 40 ग्रा. पं.ना वाहने देण्यात येणार आहेत. उर्वरित 17 ग्रा. पं.ना वाहने उपलब्ध व्हावीत यासाठी जि. पं.ला विनंती केली आहे.

बेळगाव ता.पं. कार्यक्षेत्रात तीन आमदारांचे मतदारसंघ येतात. त्यामध्ये यमकनमर्डी, बेळगाव ग्रामीण व दक्षिण कार्यक्षेत्रातील संबंधित ग्रा.पं.ना याची माहिती दिली आहे. याबाबत अनेकांना उत्सुकता असली तरी कचरा गोळा करण्यासाठी नागरिक अनुत्सुक आहेत.

Related Stories

ज्ञानी व्यक्ती देवांसाठीसुद्धा वंदनीय ठरते!

Amit Kulkarni

आज विधिमंडळ अधिवेशनात काय घडले ..?

Rohit Salunke

तहसिलदार कार्यालयातील ऑनलाईन कामकाज ठप्पच, नागरिकांचीही पाठ

Patil_p

शनिमंदिर कॉर्नरवर वाहतूक कोंडी

Patil_p

जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी सुवासिनींनी घातले साकडे

Omkar B

आर्द्रा नक्षत्रातच गडगडाटासह पाऊस

Amit Kulkarni
error: Content is protected !!