Tarun Bharat

थायलंडच्या पंबमध्ये आग, 40 जणांचा मृत्यू

Advertisements

वृत्तसंस्था/ बँकॉक

थायलंडच्या पूर्व भागातील एका पबमध्ये शुक्रवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत किमान 40 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण जखमी झाले असल्याची माहिती पोलीस तसेच बचाव पथकाच्या कर्मचाऱयांनी दिली आहे.

बँकॉकपासून 160 किलोमीटर अंतरावरील चोनबुरी प्रांताच्या सत्ताहिप येथील माउंटेन बी पबमध्ये ही आगीची दुर्घटना घडली आहे. यामागील कारणांचा शोध घेतला जात असल्याचे प्रांतीय पोलीस प्रमुख मेजर जनरल अत्थासित खिज्जाहन यांनी सांगितले आहे. पबचे मालक आणि कर्मचाऱयांची जबानी घेण्यात येत असून फॉरेन्सिक पथक घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असल्याचे खिज्जाहन यांनी म्हटले आहे.

विस्फोटानंतर एका मिनिटात आग पबमध्ये वेगाने फैलावली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांना या आगीवर नियंत्रण मिळविण्यास दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागला आहे. रात्री उशिरा 1 वाजता ही आग लागली होती. तर मृतांमध्ये सामील सर्व जण थायलंडचे नागरिक असल्याचे सांगण्यात आले. आगीत होरपळल्याने 40 जणांना जीव गमवावा लागाल्याचे सवांग रोजनाथम्मासथान फौंडेशनने म्हटले आहे.

हा पब विदेशी पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होता. येथे मोठय़ा संख्येत भारतीय पर्यटकही पोहोचत होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकांना सुरक्षितस्थळाच्या दिशेने पळताना पाहिले जाऊ शकते.

Related Stories

जर्मनीत टाळेबंदीला तीव्र विरोध

Patil_p

युक्रेनमधील 79 वर्षीय ‘शूटर आजी’

Patil_p

युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार जर्मनी

Patil_p

फिलिपाईन्स भारताकडून खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र

datta jadhav

गलवान संघर्ष : चीनचा कबुलीजबाब

Patil_p

देवमाशाने गिळले तरीही बचावला

Patil_p
error: Content is protected !!