Tarun Bharat

जलस्रोत खात्यामार्फत राज्यातील 40 तळय़ांचे पुनरुज्जीवन करणार

Advertisements

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती, फातोर्डातील दवंडे व दामोदर देवस्थानजवळील तळय़ांची पाहणी

प्रतिनिधी /मडगाव

जलस्रोत खात्यामार्फत राज्यातील 40 तळय़ांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असून त्याअंतर्गत तीन तळ्यांच्या विकासकामांसाठी निविदा काढण्यात आल्या असल्याची माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. फातोर्डा मतदारसंघातील दवंडे तसेच दामोदर (शिवलिंग) देवस्थानजवळील तळ्यांची मंत्री शिरोडकर यांनी मंगळवारी सायंकाळी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

अमृत सरोवर योजनेच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवश्यक निधी पुरविलेला असून त्याअंतर्गत विकासकामे राबविणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, नगरसेवक जॉनी क्रास्टो, व्हितोरिनो त्रावासो, नगरसेविका पूजा नाईक यांची उपस्थिती होती.

दवंडे येथील तळे हा बांध होता. तो पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. हे तळे उपसण्यात येईल तसेच सुशोभिकरण करण्यात येईल. शेतीसाठी येथील पाण्याचा वापर होण्याबरोबरच स्थानिकांना येथे येऊन वेळ घालवावा असे वाटणे आवश्यक आहे, असे शिरोडकर म्हणाले. या तळ्याच्या विकासासाठी अंदाजित खर्च तयार करण्यात आला असून त्यात आवश्यक बदल करून लवकरच निविदा काढली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दामोदर देवस्थानजवळील तळीचीही जलस्रोतमंत्र्यांनी पाहणी केली व येथील सुशोभिकरणासाठी आवश्यक सहकार्य आपल्या खात्यामार्फत देण्यात येईल असे सांगितले. यानंतर जुन्या बाजारातील दिवाणी न्यायालयाजवळून जाणारा मोठा नाला उपसण्याची गरज सरदेसाई यांनी व्यक्त केली. नुकतीच येथे पावसाळ्यात पूरसदृश स्थिती उद्भवली होती. त्यामुळे तो उपसण्याची अत्यंत गरज असल्याचे मंत्र्यांना सांगण्यात आले असता आवश्यक कृती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आपण विधानसभेत तळ्यासंदर्भातील प्रश्न मांडला असता मंत्री शिरोडकर यांनी आपल्या मतदारसंघाला भेट देऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळल्याचे सांगून आमदार सरदेसाई यांनी त्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि फातोर्डातील आवश्यक विकासकामे जलस्रोत खात्यामार्फत मार्गी लावण्यात येईल, असा आशावाद व्यक्त केला.

Related Stories

कुळेतील शेतकऱयांनी दोन्ही हंगामात पिक घ्यावे

Omkar B

13 हजार शेतकरी दाखवा, आम्ही संघटना बंद करु !

Amit Kulkarni

पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करू नये

Amit Kulkarni

‘संकेतस्थळांकडे लक्ष देण्याचे काम मुख्यमंत्री, मुख्य सचिवांचे नव्हे’

Patil_p

आयकर विभागाकडे १.५ कोटी रूपयांची परतफेडीची करणार मागणी ईएसजी उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांची माहिती

GAURESH SATTARKAR

झवेरीसोबतचा मुख्यमंत्र्यांचा फोटो नेमका कुठला ? : ढवळीकर

Patil_p
error: Content is protected !!