Tarun Bharat

पोटनिवडणुकीत 40 ते 45 टक्के मतदान

रामपूर, आझमगड, संगरूरमध्ये लोकसभा पोटनिवडणूक : दिल्लीत राजेंद्रनगरमध्ये विधानसभा जागेसाठी मतदान

लखनौ, नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

उत्तर प्रदेशमधील आझमगड आणि रामपूरमध्ये गुरुवारी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपा 41 टक्के मतदान झाले. तर पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघात केवळ 37 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तसेच दिल्लीतील राजेंद्रनगरमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत पाच वाजेपर्यंत 44 टक्के मतदान झाले होते. एकंदर सर्व ठिकाणी जवळपास 40 ते 45 टक्क्यांपर्यंताच मतदान झाल्याचे दिसून आले. या निवडणुकांची मतमोजणी 26 जून रोजी होणार आहे.

रामपूरमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 32.19 टक्के आणि आझमगडमध्ये 37.82 टक्के मतदान झाले. येथील बिलासपूर, रामपूरच्या मतदान केंद्रावर गोंधळ झाला. आझमगडमध्ये 13 आणि रामपूरमध्ये 6 उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही ठिकाणी सुमारे 35 लाख मतदार या उमेदवारांना मतदान करत आहेत. एकूण 3,809 बूथ उभारण्यात आले होते. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आझमगड आणि आझम खान यांनी रामपूरमधून राजीनामा दिल्यानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत.

आझमगडमध्ये तिरंगी सामना

आझमगडमधील लढत तिरंगी आहे. येथे सपाने धर्मेंद्र यादव यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने भोजपुरी स्टार दिनेशलाल यादव निरहुआ यांना उमेदवारी दिली आहे. बसपने शाह आलम उर्फ गुड्डू जमाली यांना उमेदवारी दिली आहे. रामपूरमध्ये सपा आणि भाजपमध्ये लढत आहे. आझम खान यांचे निकटवर्तीय असीम राजा यांच्यावर सपाने विश्वास दाखवला असला तरी भाजपकडून रिंगणात असलेले घनश्याम लोधी त्यांना कडवी टक्कर देत आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. रामपूरमध्ये बसपा निवडणूक लढवत नसल्यामुळे येथे दुरंगी लढत होत आहे.

रामपूर मतदारसंघ सपासाठी महत्त्वाचा

रामपूर लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या पाच जागा आहेत. येथे विधानसभेच्या दोन जागा भाजपच्या, तर तीन जागा सपाच्या ताब्यात आहेत. येथील तीन विधानसभा जागांवर विजय-पराजयाचे अंतर 50 टक्क्मयांहून अधिक मुस्लीम मतदार ठरवतात. याशिवाय या परिसरात लोध जातीच्या मतदारांचेही मोठे वर्चस्व आहे. या लोकसभा जागेसाठी एकूण 16 लाख मतदार आहेत.

पंजाब-संगरूरमध्ये भगवंत मान यांची अग्निपरीक्षा

संगरूर लोकसभा जागेसाठी गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. या जागेवर आम आदमी पार्टी (आप), काँग्रेस, अकाली दल, भाजप आणि एसएडी (अमृतसर) यांच्यात लढत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत येथे 29.01 टक्के मतदान झाले होते. संगरूर लोकसभा मतदारसंघ पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा बालेकिल्ला आहे. मान यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुका येथून जिंकल्या. 2019 मध्ये जिंकणारे ते देशभरातील ‘आप’चे एकमेव खासदार होते. आता गेल्या आठवडाभरापासून ते संगरूरमध्ये अडकले आहेत. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही येथे प्रचार केला आहे. येथील सरपंच गुरमेल सिंग घरांचो यांना आपने तिकीट दिले आहे.

Related Stories

बंदीपोरात शाकीर अल्ताफसह तिघांचा खात्मा

datta jadhav

सेन्सेक्सची ऐतिहासिक कामगिरी; प्रथमच ६० हजारांवर

Abhijeet Shinde

सिरमने जाहीर केली कोरोनावरील लसीची किंमत; बनवणार 10 कोटी डोस

datta jadhav

महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यांसाठी नवी नियमावली

Patil_p

आंतरखंडीय क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाकडून चाचणी

Patil_p

जोधपूरमध्ये एकाच कुटुंबातील 11 पाकिस्तानी शरणागतींचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!