विमानातून उतरताच मास्क काढून करविले फोटोशूट
ऑस्ट्रेलियात 41 हजार फुटांच्या उंचीवर झालेला एक विवाह समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हर्जिन एअरलाइन्सच्या मेलबर्न ते सिडनी विमानातील प्रवासादरम्यान इलेयन टियॉन्ग आणि ल्यूक सेरडार यांनी परस्परांना अंगठी घालून पुष्पगुच्छ दिले आहेत. ऑस्ट्रेलियन अभिनेत्री टोटी गोल्डस्मिथ विवाह करविण्यासाठी पाद्रीच्या भूमिकेत दिसून आली. विमानात हवाईसुंदरींनी विवाहाची घोषणा केली तर 150 प्रवासी या विवाहाचे साक्षीदार ठरले आहेत.
व्हर्जिन एअरलाइन्सचे मालक रिचर्ड बेन्सन यांनी समाजमाध्यमांवर ही घटना मांडली आहे. वधू असलेली इलेयन स्वतः वेडिंग प्लॅनर आहे. स्वतःच्या जीवनात शेकडो पद्धतीने शेकडो विवाहसोहळे आयोजित करविले आहेत. पण स्वतःचा विवाह अनोख्या प्रकारे करू इच्छित होते. ल्युकला भ्रमंती आणि विमानातून प्रवास करणे आवडते. अशा स्थितीत मित्रांनी विमानात विवाह करण्याची कल्पना सुचविल्यावर ती अत्यंतपसंत पडल्याचे इलेयनने सांगितले.
14 फेब्रुवारी रोजी विवाह करण्याची योजना होती, पण तेव्हा व्हिक्टोरिया शहरात टाळेबंदीमुळे ही योजना दोन आठवडय़ांसाठी पुढे ढकलावी लागली. विमानात दोघांनीही पूर्णवेळ मास्क घातलेला होता. सिडनी येथे पोहोचल्यावर मास्क उतरविला आणि त्यानंतरच त्यांचे फोटोशूट होऊ शकले आहे.