Tarun Bharat

424 कोरोनाबाधित गर्भवतींची प्रसूती

बिम्समध्ये ऑक्सिजन बेडची मागणी घटली

प्रतिनिधी / बेळगाव

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुसऱया लाटेत 594 कोरोनाबाधित गर्भवती महिला उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 424 जणींची प्रसूती झाली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बुधवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी बिम्सला एसडीआरएफ अनुदानातून 2 कोटी 33 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 501 बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी 384 ऑक्सिजन बेड आहेत. आतापर्यंत 4 हजार 207 कोरोनाबाधितांवर व 3 हजार 309 सारी रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. याबरोबरच 20 केएल ऑक्सिजन टँकर उभारण्यास अनुमती देण्यात आली आहे.

बिम्स व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्ण संख्येत घट होत चालल्यामुळे ऑक्सिजन बेडच्या मागणीतही घट होत चालली आहे. तज्ञ डॉक्टर व कर्मचाऱयांची कमतरता दूर करण्यासाठी कंत्राटीपद्धतीवर डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांची नियुक्ती करण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ग्रुप डी कर्मचाऱयांचीही कमतरता असून 100 कर्मचाऱयांची कंत्राटीपद्धतीवर भरती करण्यासाठी एसडीआरएफ अनुदानातून अनुमती देण्यात आली आहे. याबरोबरच 40 स्टाफनर्स व 10 तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यासही मंजुरी मिळाली आहे.

Related Stories

विश्वकर्मा जयंती उत्साहात

Patil_p

कोरोना फैलाव वाढलेल्या गावांना जिल्हाधिकाऱयांची भेट

Amit Kulkarni

शाळा इमारत बांधकाम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

शुभम शेळके यांना मोठय़ा मताधिक्याने निवडून द्या

Amit Kulkarni

ग्रामीण जनतेला शुद्ध पाणी मिळणार कधी?

Amit Kulkarni

गुप्त माहिती मिळविण्यासंदर्भात पोलिसांनी गिरवले धडे

Tousif Mujawar