7 आश्चर्यांमध्ये सामील क्राइस्ट रिडीमरची दुसरी प्रतिमा तयार करणारा ब्राझील जगातील पहिला देश आहे. 7 आश्चर्यांमध्ये सामील कुठल्याही प्रतिमेपेक्षा अधिक उंचीचा पुतळा तयार करण्यात येत आहे. ब्राझीलच्या एनकांटाडो जिल्हय़ात जीसस क्राइस्टचा 43 मीटर उंचीचा पुतळा तयार करण्यात येत आहे. हा रियो येथील 30 मीटर उंच क्राइस्ट द रिडीमर पुतळय़ापेक्षा 13 मीटर अधिक उंचीचा असणार आहे. रविवारी याच्या 28 मीटर रुंदीसह दोन्ही हातांची निर्मिती पूर्ण झाली आहे. या पुतळय़ाची निर्मिती 2019 मध्ये सुरू झाली होती. ऑक्टोबरमध्ये क्राइस्ट द रिडीमर पुतळय़ाच्या 90 व्या स्थापनादिनापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
याच्या निर्मितीकरता 2.61 कोटी रुपये खर्च येण्याचा अनुमान आहे. प्रकल्पाची पूर्ण रक्कम देणगीद्वारे प्राप्त झाल्याचे असोसिएशन ऑफ प्रेंड्स ऑफ क्राइस्टने सांगितले आहे. क्राइस्ट द रिडीमरच्या पुतळय़ाला ख्रिश्चन धर्माचे एक जागतिक प्रतीक मानले जाते. हा पुतळा पाहण्यासाठी जगभरातून लाखो लोक पोहोचतात. तसेच यामुळे रियो डी जेनेरियो शहराचा पर्यटन उद्योगही चालतो.