वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्षक दिनानिमित्त 44 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले होते.
स्वतःच्या विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाबद्दल स्वारस्य निर्माण करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. संवेदनशील शिक्षक स्वतःचे वर्तन आणि शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मूल्ये तसेच नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांबद्दल निष्ठा निर्माण करणारी, देशाबद्दल प्रेमाची भावना बळकट करणारी तसेच बदलत्या जागतिक स्थितीत स्वतःच्या भूमिकेबद्दल जागरुकता निर्माण करणारी आमची शिक्षण व्यवस्था असायला हवी असे उद्गार राष्ट्रपतींनी काडले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 5 सप्टेंबर रोजी देशात शिक्षक दिन साजरा केला जातो.