Tarun Bharat

45 वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी आज कोविशिल्डचा दुसरा डोस

चेंगराचेंगरीनंतर शहरी भागात ऑनलाईन नोंदणी

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरातील मिस्त्राr हायस्कूल येथे सोमवारी लसीकरणासाठी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकारानंतर आता प्रशासनाने 45 वर्षांवरील लसीकरणही ऑनलाईन नोंदणीनेच होणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले आहे. त्यामुळे आता 45 वर्षांवरील शहरी भागातील लोकांना Dee@veueeF&ve नोंदणी करुनच लसीकरणासाठी जावे लागणार आहे. आज 13 मे रोजी जिह्यातील 14 केंद्रावर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लसीकरण होणार आहे..

पूर्वी 45 वर्षांवरील वयोगटासाठी कोरोना लसीकरणाच्या दुसऱया मात्रेसाठी ऑफलाईन नोंदणीद्वारे लसीकरण केले जात होते. पण सोमवारी रत्नागिरीत मिस्त्राr हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत ऑनलाईन अपाँईंटमेंट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. गुरुवार 13 मे रोजी कोविशिल्ड लस शहरी भागात एकूण 14 केंद्रांवर मिळणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. कोविशिल्डची दुसरी मात्रा 45 वर्षे वयोगटावरील नागरिकांना देण्यात येणार आहे. त्यामध्ये मंडणगड-नूतन हायस्कूल दापोली-सोहोनी विद्यामंदिर, खेड-सहजीवन हायस्कूल, गुहागर-जीवन शिक्षण शाळा, चिपळूण-नागरी दवाखाना चिपळूण 1, नागरी दवाखाना चिपळूण 2, संगमेश्वर येथे ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर, ग्रामीण रुग्णालय देवरूख येथे लसीकरण होणार आहे. तसेच रत्नागिरीत नागरी दवाखाना कोकणनगर, पटवर्धन हायस्कूल, मिस्त्री हायस्कूल, लांजा- लांजा हायस्कूल, राजापूर-ग्रामीण रुग्णालय राजापूर, ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे लसीकरण होणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

Related Stories

कोकणात येणार आता परराज्यातील वाळू?

Patil_p

बंद दूध डेअरीला आठ लाखाचे नवे मशीन!

NIKHIL_N

गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

Patil_p

सराफ व्यापाऱ्याचा मोबाईल मुंबईला नेणाऱ्याचा पोलिसांना शोध

Archana Banage

अवकाळी पावसाने खाडीभागाचे लाखो रुपयांचे नुकसान

Patil_p

Ratnagiri : महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली नको; राजापुरवासीयांची मागणी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!