अखेर नव्हे तर नव्या युगाची सुरूवात : पंतप्रधान बोरिस यांचे प्रतिपादन
लंडन :
जगभराच्या नजरा लागून राहिलेल्या बेक्झिटची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली आहे. बेक्झिटच्या माध्यमातून ब्रिटन युरोपीय महासंघातून अखेर बाहेर पडला आहे. जागतिक प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी रात्री 11 वाजल्यावर आणि भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे साडेचार वाजता युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडला आहे. 47 वर्षांच्या भागीदारीनंतर ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचे पाऊल उचलले आहे.
ही अखेर नसून आता नव्या युगाची सुरुवात झाल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रेक्झिटनंतर बोलताना म्हटले आहे. हुजूर पक्षाचे नेते जॉन्सन यांनी ब्रेक्झिट म्हणजे युरोपीय महासंघापासून विभक्त होण्याचा मुद्दा उचलून धरल्यामुळेच त्यांना जनतेच्या पाठिंब्यातून मोठा विजय मिळवला आहे. ब्रिटनच नव्या वाटचालीस प्रारंभ होत असून एकजूटता दाखवत देशाचा विकास करण्यावर भर देणार असल्याचेही जॉन्सन यांनी म्हटले आहे.
1973 मध्ये ब्रिटनचा प्रवेश
युरोपीय महासंघात ब्रिटनचा समावेश 1973 मध्ये झाला होता. 47 वर्षांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी वर्षी ब्रिटनने युरोपीय महासंघाला सोडचिठ्ठी दिली आहे. आहे. ब्रिटनच्या या निर्णयामुळे युरोपीय महासंघाच्या सदस्यांची संख्या आता 27 वर आली आहे.