Tarun Bharat

476 प्राथमिक शिक्षकांच्या अखेर बदल्या

1 हजार 703 शिक्षकांचे कौन्सिलिंग : अद्याप 156 जागा रिक्त

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षकांची बदली कौन्सिलिंग प्रक्रिया सोमवारपासून सुरू होती. 1 हजार 703 अर्ज केलेल्या शिक्षकांचे कौन्सिलिंग करण्यात आले. यामध्ये आपल्याला हव्या असणाऱया ठिकाणी 476 शिक्षकांनी बदल्या घेतल्या. तर अद्यापही 156 जागा रिक्त राहिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे ज्या ठिकाणी शिक्षक नव्हते, अशा ठिकाणी आता शिक्षक उपलब्ध होणार आहेत.

 क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, सहशिक्षक व विशेष शिक्षक यांसाठी क्लब रोड येथे सोमवारपासून कौन्सिलिंग करण्यात येत होते. बेळगाव शहरासह तालुका, खानापूर, बैलहोंगल, सौंदत्ती व रामदुर्ग तालुक्मयातील शिक्षकांसाठी कौन्सिलिंग झाले. परंतु खानापूर, सौंदत्ती व रामदुर्ग या तालुक्मयांमध्ये 25 टक्क्मयांहून अधिक जागा रिक्त असल्यामुळे या ठिकाणचे कौन्सिलिंग थांबविण्यात आले. त्यामुळे काहीकाळ गोंधळ झाला होता. शिक्षक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पहिल्याच दिवशी मोजक्मयाच शिक्षकांचे कौन्सिलिंग झाले.

पाच दिवसांमध्ये 1 हजार 703 शिक्षकांचे कौन्सिलिंग करण्यात आले. प्रत्येक दिवशी 400 ते 500 शिक्षकांचे कौन्सिलिंग झाले. कौन्सिलिंगसाठी सकाळपासूनच शिक्षकांची जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात गर्दी होत होती. खानापूर तालुक्मयातील शिक्षकांना कौन्सिलिंगमध्ये भाग घेता न आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे अनेकांना माघारी फिरावे लागले.

156 जागा अद्याप रिक्त

कौन्सिलिंगसाठी आलेल्या शिक्षकांनी आपल्याला हव्या असणाऱया जागांवर बदली घेतली. उर्वरित शिक्षकांनी बदली घेतली नाही. कौन्सिलिंग प्रकिया पूर्ण होऊनही अद्याप 156 जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागा लवकर भरण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

Related Stories

काळादिन खटलाप्रकरणात नेत्यांना जामीन

Amit Kulkarni

विकेंड लॉकडाऊनमुळे दुपारनंतर शहरात नीरव शांतता

Amit Kulkarni

कलाश्री सातव्या बक्षिसाचे लक्ष्मण खेमनाळकर मानकरी

Amit Kulkarni

बेळगाव शहरात उत्साहात ईद-ए-मिलाद साजरा

mithun mane

मराठा बँकेवर सत्ताधारी पॅनलची सत्ता

Patil_p

कोरोनामधील मृतांच्या वारसांना धनादेश वितरण

Amit Kulkarni