प्रतिनिधी /बेळगाव
कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज बेळगाव यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्ये÷ांचा सन्मान हा या कार्यक्रमाचा मुख्य गाभा होता. कच्छमध्ये गावातील वरि÷ जोडप्यांचा आणि नागरिकांचा सन्मान करण्याची प्रथा आहे, त्याला अनुसरून बेळगावात प्रथमच वरि÷ अशा 49 जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. शास्त्रीनगर येथील श्री पाटीदार भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला समाजातील सर्व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आपल्या ज्ये÷ांबद्दल तरुण पिढीच्या मनात स्नेहभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. समाजाचे अध्यक्ष जेठाभाई पटेल, सरचिटणीस रतनशीभाई पटेल, सोसायटीचे अध्यक्ष बाबूभाई पटेल व सर्व संचालक मंडळाची उपस्थिती होती. प्रारंभी कुलदेवी उमियादेवीच्या फोटोचे पूजन करण्यात आले. जवेरलाल पटेल यांनी अहवाल वाचन केले. समाजाचे अध्यक्ष जेठाभाई पटेल, महामंत्री रतनशीभाई पटेल, बाबूभाई पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अश्विन पटेल यांनी केले.
युवा मंडळातर्फे मातृ-पितृ वंदनेचा कार्यक्रम झाला. ज्यामध्ये समाजाचे ज्ये÷ नागरिक नानजीभाई आणि माताजी जेठीबाई यांची मुख्य यजमानपदी नियुक्ती झाली आणि महाराज विशाल जोशी यांच्या हस्ते शास्त्राsक्त विधीनुसार माता व वडील यांचे पूजन त्यांची मुले आणि सुना यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षा आणि मीनल पटेल यांनी केले.