Tarun Bharat

5 एप्रिलला रात्री 9 वाजता लाईट बंद करून घरोघरी दिवे लावू या : पंतप्रधान

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशभरात जारी करण्यात आलेल्या लॉक डाऊन ला आज नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. याला आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या दिवसांमध्ये सरकार आणि सर्व लोकांनी जो सामूहिक लढा दिला, याबद्दल पंतप्रधान मोदी यांंनी सर्वांचे आभार मानले. 


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, कोरोनामुळे देशात झालेला अंधार दूर करण्यासाठी, या कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपल्याला चारी दिशांना प्रकाशमय करायचे आहे. 

यासाठी येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिल ला रात्री नऊ वाजता सर्वांनी नऊ मिनिटांसाठी घरातीलसर्व लाईट बंद करून आपल्या घरात, घरातील बाल्कनी मध्ये एक दिवा लावा.

ज्यावेळी घरातील सर्व लाईट बंद होऊन, सर्व घरात दिवा उजळेल तेव्हा आपण एकाच ध्येयाने लढत आहोत हे सिद्ध होईल. तेव्हा प्रत्येकाने मनात संकल्प करा आपण एकटे नाही आहोत. 

मात्र, यावेळी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग चे पालन करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. 

Related Stories

काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसतेय तृणमूल

Patil_p

शबरीमला प्रकरणामुळे माकपला फटका

Patil_p

अमित शहांचा प्रचार प्रारंभ कैराणातून

Patil_p

75 वर्षांवरील वयोवृद्धांना मोठा दिलासा

Patil_p

प्रदूषणरहित इंधनाचा वापर करणार रेल्वे

Patil_p

lakhimpur kheri violence: सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला पुन्हा एकदा फटकारले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!