Tarun Bharat

5 कंपन्यांकडून राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी

Advertisements

एडीआरचा अहवाल प्रसिद्ध

@ वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

राजकीय पक्षांना देणगी देण्याप्रकरणी भारतीय एअरटेलची पालक कंपनी भारती एंटरप्राइजेज पहिल्या स्थानावर आहे. राजकारणात पारदर्शकतेसाठी काम करणारी संसथा असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) एका अहवालानुसार 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये राजकीय पक्षांना देणगी देण्याप्रकरणी भारती एंटरप्राइजेजशी निगडित प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट आघाडीवर राहिला आहे.

एडीआरच्या अहवालानुसार राजकीय पक्षांना देणगी देण्याप्रकरणी आयटीसी लिमिटेड, जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट, बीजी शिर्के कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि पंचशील कॉर्पोरेट पार्क प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या आघाडीवर राहिल्या आहेत. 2018-19 मध्ये प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देण्याप्रकरणी दुसऱया स्थानावर राहिला होता. तेव्हा टाटा समुहाशी संबंधित प्रोग्रेसिव्ह  इलेक्टोरल ट्रस्ट पहिल्या स्थानावर होता.

2019-20 या आर्थिक वर्षात प्रूडेंट  इलेक्टोरल ट्रस्टने राजकीय पक्षांना 247-75 कोटी रुपयांची देणगी दिली. यादरम्यान प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्टने भाजपला 216-75 कोटी रुपये तर काँग्रेसला 31 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. कुठल्याही पक्षाला 20 हजार रुपयांहून अधिक देणगी दिल्यावर संबंधिताचे नाव, पत्ता आणि पॅन क्रमांक इत्यादी माहिती द्यावी लागते. तर याहून कमी रकमेच्या देणगीप्रकरणी नावाचा खुलासा करण्याची गरज नसते

भाजपला सर्वाधिक देणगी

2019 मध्ये 5 राजकीय पक्षांना 921.95 कोटी रुपयांची कॉर्पोरेट देणगी मिळाली. यात 720.40 कोटी रुपये भाजपला प्राप्त झाले. भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आणि तृणमूल काँग्रेसलाही कंपन्यांकडून देणगी मिळाली आहे. काँग्रेसला 133.04 कोटी तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15.8 कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे.

माकपचे देणगीदार

माकपला मुथूट फायनान्सकडून 2.5 कोटी, कल्याण ज्वेलर्सकडुन 1.12 कोटी रुपये तसेच नवयुग इंजिनियरिंगकडून 50 लाख रुपये मिळाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये सत्तारुढ तृणमूल काँग्रेसला न्यू डेमोक्रेटिक इलेक्टोरल ट्रस्ट, टेक्समॅको इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग लिमिटेड आणि टेक्समॅको रेल अँड इंजिनियरिंग लिमिटेडकडून देणगी प्राप्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला शिर्के कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, पंचशील कॉर्पोरेट पार्क प्रायव्हेट लिमिटेड आणि मॉडर्न रोड मेकर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून देणगी मिळाली आहे.

Related Stories

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नॉमिनीशी निगडित नियमात बदल

Patil_p

136 वर्षांची सातत्यपूर्ण समाजसेवा

Patil_p

रेशनकार्ड धारकांसाठी ‘मेरा रेशन’ ऍप

Patil_p

भाजपला रोखण्यासाठी प्रसंगी रक्त सांडू : ममता बॅनर्जी

Patil_p

अक्षरधाम हल्ल्यावर येतोय चित्रपट

Patil_p

अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्या पुर्ननियुक्तीला केंद्राचा हिरवा कंदील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!