Tarun Bharat

5 देशांमध्ये नाही एकही विमानतळ

तरीही नागरिक करतात आंतरराष्ट्रीय प्रवास

जगात काही देश असे आहेत जेथे एकही विमानतळ नाही. सद्यकाळात हवाई प्रवास आता केवळ धनाढय़ लोकांपुरती मर्यादित राहिलेला नाही. विदेशात प्रवास करणाऱया लोकांचे प्रमाण वाढल्याने अनेक देशांमध्ये एकाहून अधिक आंतरराष्ट्रीय विमानतळे निर्माण करण्यात आली आहेत. भारतातही अनेक शहरांमधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. परंतु जगातील 5 देशांमध्ये एकही विमानतळ नाही.

स्पेन आणि फ्रान्स यांच्यामधील एनडोरा एक छोटासा देश असून तो पूर्ण युरोपपासून पायरनीज पर्वतरांगांमुळे विभागला गेलेला आहे. या देशाचा भौगोलिक आकार मोनॅकोपेक्षा अधिक आहे. तरीही या देशाकडे स्वतःचे विमानतळ नाही. हा देश पूर्णपणे पर्वतीय क्षेत्रात असल्याने येथे विमानतळ निर्माण करणे शक्य नाही. या देशापासून सर्वात नजीकचे विमानतळ 30 किलोमीटरवर आहे.

लिकटनस्टाइन प्रिंसिपॅलिटीमध्ये कमी जागा अन् पर्वतीय भागांमुळे विमानतळ निर्माण करणे अत्यंत अवघड आहे. या प्रिंसिपॅलिटीचा आकार 160 चौरस किलोमीटर आहे. लिकटनस्टाइनच्या अत्यंत विचित्र भौगोलिक स्थितीमुळे येथे विमानतळ तयार करता आलेला नाही. यामुळे येथील नागरिक बस किंवा कॅबद्वारे ज्यूरिच विमानतळावर जातात, हा विमानतळ येथून 120 किलोमीटर अंतरावर आहे.

द व्हॅटिकन सिटीला जगातील सर्वात छोटय़ा देशाचा दर्जा प्राप्त आहे. या देशाचा आकार केवळ 0.44 चौरस किलोमीटर असून येथे विमानतळ नाही. हा देश रोमदरम्यान असल्याने येथे सागरी मार्गही नाही. याचमुळे लोकांना पायी किंवा वाहनाने प्रवास करावा लागतो. हवाई प्रवासासाठी लोकांना फियुमिसिनो आणि सियामपिनो विमानतळापर्यंत जावे लागते.

मोनॅको प्रिंसिपॅलिटी अन्य देशांशी रेल्वेने जोडले गेलेले आहे. या देशात येणारी सामग्री केवळ जहाजाच्या माध्यमातून येतो. देश छोटा असून लोकसंख्या 40 हजारांच्या आसपास आहे. यामुळे येथे विमानतळ निर्माण करणे शक्य नाही. मोनॅकोने स्वतःचा शेजारी देश नाइसशी करार केल्याने लोकांना तेथून विमानप्रवास करता येतो. कारद्वारे 30 मिनिटात विमानतळापर्यंत पोहोचता येते.

सॅन मारिनो हे व्हॅटिकन सिटी किंवा रोमपासून फारसे दूर नाही. हा इटलीने घेरलेला देश आहे. येथे विमानतळासाठी पुरेशी जागा नाही. देशाच्या सर्वात नजीकचे विमानतळ रिमिनी असून ते 16 किलोमीटर अंतरावर याहे. याचबरोबर व्हेनिस, पीसा, फ्लोरेन्स आणि बोलोंगना विमानतळ देखील नजीक आहे.

Related Stories

चिनी सैन्यासंबंधी अमेरिकेचा महत्त्वाचा खुलासा

Patil_p

युक्रेनमध्ये एक कोटी घरातील वीजपुरवठा ठप्प

Patil_p

इयान वादळावरून फ्लोरिडात आणीबाणी

Patil_p

रोममधील विख्यात रुग्णालयानं जारी केला ओमिक्रॉन विषाणूचा पहिला फोटो

Archana Banage

पॅराशूटवीराचे थेट किचनमध्ये लँडिंग

Patil_p

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी आपल्या बाळाला दिले जीव वाचवणाऱ्या डॉक्टरचे नाव

Tousif Mujawar