नेटफ्लिक्सवर होणार स्ट्रीम
आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘डार्लिंग्स’चा टीझर सादर झाला आहे. टीझरमध्ये आलियासोबत शेफाली शाह आणि रोशन मॅथ्यू देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येत आहेत. पूर्ण टीझरमध्ये आलिया एका बेडकाची आणि विंचूची रंजक कहाणी ऐकवताना दिसून येते. कशाप्रकारे एक दुष्ट स्वतःचा मूळ स्वभाव कधीच सोडत नसल्याचे ती यात सांगताना दिसून येत आहे.
डार्लिंग्स हा आलियाचा पहिला थ्रिलर चित्रपट असून तसेच अभिनेत्रीनेच याची निर्मिती केली आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीज या कंपनीने या चित्रपटाच्या निर्मितीला सहाय्य केले आहे. हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. या चित्रपटात विजय वर्मा हा कलाकार देखील दिसून येणार आहे. ‘डार्लिंग्स’ चित्रपटात आई-मुलीची कहाणी दाखविण्यात येणार आहे. आलियाने साकारलेली व्यक्तिरेखा यात अत्यंत वेगळी असल्याचे सांगण्यात येत आहे. शेफाली शाह तसेच विजय वर्मा या दिग्गज कलाकारांची साथ आलियाला मिळाल्याने हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरण्याची शक्यत आहे.