फेसबुक पोस्ट लिहिणारा आरोपी अटकेत
पुड्डुचेरी-
पुड्डुचेरीत एका व्यक्तीने फेसबुक पोस्टद्वारे अत्यंत आक्षेपार्ह घोषणा केली आहे. जर कुणी मला 5 कोटी रुपये दिल्यास मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारणार असल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे. या धमकीवजा पोस्टनंतर पोलिसांनी कारवाई करत 43 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
पुड्डचेरी पोलिसांनुसार आरोपीचे नाव सत्यनंदम असून तो आर्यनकुप्पम गावचा रहिवासी आहे. तसेच तो रियल इस्टेट व्यावसायिक आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याने आरोपी सत्यनंदम याच्या विरोधात भादंविचे कलम 505 (1) आणि 505 (2) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.