हुआईसह अन्य चिनी कंपन्यांना ठेवले दूरच- विविध कंपन्यांची भागीदारी , जगभरातील कंपन्यांचा समावेश शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामध्ये आता नवीन संवादाचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. यामधील कम्युनिकेशन सेवेमधील 5 जी सेवा चालू वर्षात सुरु होणार असल्याचे संकेत आहेत. यासाठी सरकारने देशातील 5 जी सेवेच्या चाचणीसाठी 13 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. एका अहवालानुसार 5 जी चाचणीसाठी हुआई आणि झेडटीईसारख्या चायनीज कंपन्यांना दूरच ठेवले आहे. दूरसंचार विभागाला 5 जी चाचणीसाठी एकूण 16 प्रस्ताव मिळाले असल्याचे सांगितले आहे.
अधिकच्या उपलब्ध माहितीनुसार 5 जी चाचणीसाठी टेलिकॉम कंपन्यांकडून लवकरच 700 मेगाहर्ट्ज ब्रँडची एअरवेव देण्यात येणार आहे. यासोबतच काही नियम व अटीसोबत ही चाचणी करण्यात येणार आहे. कंपन्यांना शहरी आणि ग्रामीण क्षेत्रामधील चाचणीप्रमाणे नियमांचे पालन करावे लागणार असून सोबत नेटवर्क सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची माहिती दिली आहे.
सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)ने 5 जी चाचणीसाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमेटिक्स(सी-डीओटी) यांच्यासोबत भागीदारी केली आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमेटिक्सची स्थापना ही 1984 मध्ये करण्यात आली आहे.
या देशामध्ये 5 जी सेवा सुरू
दक्षिण कोरिया, चीन आणि युनायटेड स्टेट्समध्ये सर्वात प्रथम 5 जी सेवेचा प्रारंभ झाला होता. भारतामध्ये मात्र आता 5 जी चाचणीस प्रारंभ होणार आहे. परंतु ही सेवा जगभरातील 68 देशांच्या सीमांवर सुरु असून यामध्ये श्रीलंका, ओमान, फिलिपीन्स, न्युझीलंडसह अन्य लहान देशांचा समावेश आहे.
2021 च्या दुसऱया सहामाहीत जिओची 5 जी सेवा
इंडियन मोबाईल काँग्रेस 2020 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल)चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी, रिलायन्स जिओ 2021 च्या दुसऱया सहामाहीत (जुलै-डिसेंबर) 5 जी सेवा सादर करणार असल्याचे म्हटले होते.