वर्षभरात 7.5 कोटी 5 जी आयफोन्स निर्मितीचे ध्येय
नवी दिल्ली
जगातील टेक आणि आयफोन निर्मिती करणारी कंपनी चालू वर्षाच्या अंतिम वर्षापर्यंत ऍपल वॉच मॉडेल, नवीन आयपॅड आणि एक लहान होमपॅड सोबत कमीत कमी 7.5 कोटी 5 जी आयफोन्स बनविणार असल्याची माहिती आहे. आगामी आवृत्तीच्या आयफोन्सची शिपमेंट 2020 मध्ये 8 कोटी युनिटपर्यंत करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
आगामी महिन्यात चार नवीन 5 जी मॉडेल सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने यामध्ये चार नवीन आयफोन दाखल करण्याचे ध्येय ठेवलेले आहे. यामध्ये विविध डिझाईन्सने युक्त आयफोन्सला मोठी स्क्रीनची सुविधा मिळणार असल्याचे समजते.
ऍपलचा पहिला ओवर ईअर हेडफोन
ऍपल एज टु एज आयपॅड प्रो यासारख्या स्क्रीनसोबत नवीन आयपॅड बनविण्याचे काम सुरु आहे. यासोबत कंपनी दोन नवीन वॉच मॉडेल आणि आपले पहिले ओवर इअर हेडफोन तयार करत असून तेही बाजारात आणले जाणार आहे.