संयुक्त राष्ट्रसंघ
5 भारतीय शांतिसैनिकांसह 83 सैन्य, पोलीस आणि नागरी कर्मचाऱयांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या मरणोत्तर पदकाने चालू आठवडय़ात गौरविण्यात येणार आहे. या भारतीय सैनिकांनी ाखशांततामोहिमेत भाग घेत मागील वर्षी प्राणाचे बलिदान दिले होते.
दक्षिण सूडानमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ मोहिमेत सेवा बजावणारे मेजर रवि इंदर सिंग संधू आणि सार्जंट लाल मनोत्रा तरसेम, लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ अंतरिम दलातील सार्जंट रमेश सिंग, युएन डिसएंगेजमेंट ऑब्जर्व्हर फोर्समधील पी. जॉन्सन बेक आणि कांगोमध्ये काम करणाऱया एडवर्ड पिंटो यांना 29 मे रोजी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांती रक्षक दिनी मरणोत्तर दैग हॅमरस्कोल्द पदकाने सन्मानित केले जाईल.
यंदा शांतिसैनिकांसमोरील आव्हाने आणि धोके खूपच अधिक आहेत. कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी विविध देशांमधील लोकांचे रक्षण त्यांना करावे लागत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.