निवडणूक आयोगाचे राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेश आणि पंजाबसह 5 राज्यांमध्ये निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आयोगाने या राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकाऱयांना पत्र लिहून याची माहिती दिली आहे. आयोगाने अधिकाऱयांना तयारी सुरू करण्यास सांगितले आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोव्यात विधानसभेचा कार्यकाळ संपण्याची तारीख नजीक आल्याचे आयोगाने स्वतःच्या पत्रात नमूद केले आहे. आयोगाने राज्याच्या अधिकाऱयांना स्वतःच्या जिल्हय़ांमध्ये अधिकाऱयांच्या स्थितीचे आकलन करण्यास सांगितले आहे. आम्ही एका धोरणाचे पालन करत राहिलो आहोत. यांच्या अंतर्गत कुठल्याही कर्मचाऱयाला निवडणुकीदरम्यान स्वतःच्या मूळ जिल्हय़ात तैनात केले जाऊ शकत नसल्याचे आयोगाने म्हटले.
छोटे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात कमी जिल्हे असल्यास नियुक्तीत त्रास सहन करावा लागू शकतो. अशा स्थितीत संबंधित अधिकारी कारणासह स्वतःची समस्या मांडू शकतो असे आयोगाकडून म्हटले गेले.
या अधिकाऱयांवर लागू निर्देश
निवडणूक डय़ुटीसाठी निवड होणाऱया अधिकाऱयांवर हा निर्देश लागू होणार आहे. यात जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रिटर्निग ऑफिसर, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर, इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, एडीएम, एसडीएम यासारखे अधिकारी देखील यात सामील असतील.
कधी संपतोय विधानसभेचा कार्यकाळ
राज्य तारीख
गोवा 15 मार्च 2022
मणिपूर 19 मार्च 2022
उत्तराखंड 23 मार्च 2022
पंजाब 27 मार्च 2022
उत्तर प्रदेश 14 मे 2022