यंत्रणेतील घोळाचा नमुना उघडकीस
प्रतिनिधी / बेळगाव
आधारकार्डसाठी एखाद्याने अर्ज केला तर किती दिवसाने कार्ड मिळते, फार तर एक दोन महिन्यात अर्जदाराच्या पत्यावर कार्ड पाठविले जाते. आगरकर रोड, टिळकवाडी येथील एका मुलाचे आधारकार्ड तब्बल पाच वर्षांनंतर त्याच्या घरी आला आहे.
यंत्रणेतील घोळाचा नमुनाच त्यामुळे सामोरा आला आहे. आगरकर रोड येथील शाश्वत सचिन बाळेकुंद्री या मुलाच्या आधारकार्डसाठी 6 जून 2015 रोजी गोवावेस जवळील बेळगाव-वनमध्ये अर्ज करण्यात आला होता. त्याचवेळी आधारकार्डसाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.
एक दोन महिना, सहा महिने, एक वर्षे प्रतिक्षा करुनही त्यांच्या घरी कार्ड पोहोचले नाही. आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी आधारकार्डची सक्मती आहे. अशा परिस्थितीत शाश्वत व त्याच्या कुटुंबियांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. वारंवार विचारणा करुनही त्याचा उपयोग झाला नव्हता.
दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी आधारकार्ड पोहोचले आहे. त्यापाकिटावर 3 जुलै 2020 तारीख नोंदविलेला शिक्का मारण्यात आला आहे. यावरुन अर्ज केल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी आधारकार्ड पाठविण्याचाप्रकार घडला आहे. शाश्वतचे आजोबा अनंत महादेव बाळेकुंद्री यांनी तरुण भारतला ही माहिती देतानाच एकंदर प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.