Tarun Bharat

रेल्वेत 5.70 लाखाची बॅग चोरणारा वास्कोतून जेरबंद

Advertisements

अवघ्या 6 तासात तपास : कोईमतूर एक्सप्रेस रेल्वेत झाला चोरीचा प्रकार,आरोपी अस्लम चाँदसाब कलागरला कोठडी

प्रतिनिधी /मडगाव

उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे जाणाऱया एका रेल्वे प्रवासी महिलेची सुमारे 5 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज असलेली एक बॅग लंपास केलेल्या आरोपीला कोकण रेल्वे पोलिसांनी अवघ्या 6 तासात ही केस सोडवत आरोपीला वास्को येथून अटक केली.

वास्को येथील साईनगर -फकीरगल्ली येथे राहणाऱया या आरोपीचे अस्लम चाँदसाब कलागर (27) असे नाव असून इतर चोऱयांत या आरोपीचा हात असावा या संशयाने त्याची सखोल चौकशी चालू आहे.

कोकण रेल्वे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी या प्रकरणी सोमवारी सायंकाळी सविस्तर माहिती दिली.

सुनिता नायर ही गुजरातातील अहमदाबाद येथून आपल्या कुटूंबासमवेत 24 जून 2022 रोजी कोईमतूर एक्सप्रेस रेल्वेतून केरळ येथील कन्नूर येथे जात होती.  पहाटेच्यावेळी मडगाव रेल्वे स्थानकावर या रेल्वेने थांबा घेतला होता. एव्हाना पहाटेचे 03.30 वाजलेले होते.

रेल्वे सुटण्याच्या तयारीत असताना अकस्मात एक अज्ञात युवक या प्रवासी महिलेजवळ आला आणि तिच्या हातातील बॅग हिसकाऊन धावत्या रेल्वेच्या डब्यातून खाली उतरला आणि अंधारात गायब झाला.

एव्हाना रेल्वे सुटली होती. या महिलेने रेल्वेत असलेल्या तिकीट तपासनिसाच्या मार्फत रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना माहिती दिली. ही माहिती मिळताच तपास यंत्रणा तपासाला लागले. या तपासात पोलिसांना वास्कोतील साईनगर फकीरगल्ली येथील अस्लम चांदसाब कलागर हा आरोपी दिसून आला.

या आरोपीला वास्कोला वरील जागी जाऊन जेरबंद करण्यात आले. त्याला कोकण रेल्वे पोलिसांनी पोलीस स्थानकात आणून त्याची सखोल चौकशी केली. हा आरोपी वरील जागी एका भाडय़ाच्या खोलीत राहात होता. त्याकडे सदर प्रवासी महिलेची चोरीस गेलेली बॅग सापडली.

या बॅगमध्ये रोख 20 हजार रुपये, त्याशिवाय 5 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने मिळून 5.70 लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.

  या आरोपीसंबंधीचा संशय आणखी बळावल्याने त्याला न्यायालयापुढे उभे करण्यात आले. या आरोपीचा आणखी चोऱयात हात असावा आणि म्हणून त्याची सखोल चौकशी करता यावी यासाठी न्यायालयाने या आरोपीला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

कोकण रेल्वे विभागाचे पोलीस अधीक्षक सॅमी तावारीस तसेच उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमरनाथ पासी त्याचप्रमाणे समीर शेख आणि श्रीनिवास रेड्डी यांनी या कारवाईत भाग घेतला.

Related Stories

‘तमनार’ला दिलेल्या परवान्यावरून दिशाभूल करण्याचे प्रयत्न

Patil_p

‘ओरा डायमंड’च्या कुडचडेतील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

अखंड ज्ञान साधनेमुळेच जीवन सफल झाले

Amit Kulkarni

वीज खात्याचा महसूल रू.180 कोटी पार

Amit Kulkarni

खाण अवलंबित, मच्छीमारांना भेटणार राहुल गांधी

Amit Kulkarni

दाबोळी विमानतळ, रेल्वे स्थानकावर प्रवाशांची आरोग्य तपासणी पुन्हा सुरु

Omkar B
error: Content is protected !!