Tarun Bharat

5.82 लाख शेतकऱ्यांनी भरली 511 कोटी रुपयांची थकबाकी

  • कृषीपंप वीज धोरणाला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

ऑनलाईन टीम / मुंबई :

नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाला राज्यातील शेतकरी सकारात्मक प्रतिसाद देत असून आतापर्यंत 5.82 लाख शेतकऱ्यांनी थकीत कृषीपंप विजबिलापोटी 511 कोटी 26 लाख रुपयांची रक्कम भरली आहे. प्रलंबित वीजजोड प्रकरणी तात्काळ कार्यवाही आणि थकीत वीजबिल वसुलीसाठी भरघोस सवलत देण्याच्या या नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाची आखणी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून करण्यात आली आहे.


कृषी ग्राहकांना सवलतीसह वीजबिल वसुलीसाठी महावितरणमार्फत ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत भरणा करण्यात आलेल्या 511 कोटी  26 लाख रकमेवर 256 कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. एकूण 5 लाख 82 हजार 114 शेतकऱ्यांनी ही थकबाकी भरली आहे. यात पुणे विभागात सर्वाधिक थकबाकी भरण्यात आली आहे.


राज्यातील 44 लाख 44 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 785 कोटी रुपयांची थकबाकी असून या नवीन योजनेमुळे एकूण 30 हजार कोटी रुपयांची सूट देण्यात येणार आहे.


या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद सतत वाढत असून थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे  राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आभार मानले आहेत. तसेच सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Stories

समीर वानखेंडेंनी प्रभाकर साईलच्या आरोपांचे केले खंडन, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Archana Banage

जय श्रीराम बोलण्याची जबरदस्ती, वृद्धाला बेदम मारहाण

Archana Banage

प्रकाश आंबेडकर ‘या’ कारणासाठी तीन महिन्यांच्या सुट्टीवर

Archana Banage

मराठी चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा देणार : अजित पवार

Tousif Mujawar

चांदणी चौक परिसरात कलम 144 लागू

datta jadhav

इतका अभ्यास बरा नाही; संजय राऊतांचा राज्यपालांना खोचक टोला

Archana Banage