Tarun Bharat

रस्त्यांच्या कामासाठी पाच कोटी निधी मंजूर

आमदार  शिवेंद्रराजे भोसले यांचा पाठपुरावा

प्रतिनिधी/ सातारा

सातारा विधानसभा मतदार संघातील दळणवळणाच्या सोईच्या दृष्टीने विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी नेहमीच पाठपुरावा करणाऱया आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून आ. शिवेंद्रराजे यांनी सातारा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी 5 कोटी रू. निधी मंजूर करून घेतला आहे. आ. शिवेंद्रराजे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री याचे आभार मानले आहेत.

   शिंदे-भाजप सरकार स्थापन होताच आ. शिवेंद्रराजेंनी द्धह्नद्बह्नह्नाजह्नहद्व मतदार संघातील विकासकामांसाठी निधी मिळविण्याचा धडाका सुरू केला आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे (लेखाशिर्ष 2515ा1238) या योजनेअंतर्गत सातारा तालुक्यातील रस्त्यांसाठी 5 कोटी निधी उपलब्ध करून घेतला आहे.

    शासनाने मंजूरी दिलेल्या कामांमध्ये, मौजे अनावळे अप्रोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 20 लक्ष., अटाळी अप्रोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 20 लक्ष., अष्टे अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे 25 लक्ष., नित्रळ अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लक्ष., निगुडमाळ अंतर्गत रस्ते कॉकिटीकरण करणे 10 लक्ष., अंबवडे खुर्द अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे 25 लक्ष., सायळी अंतर्गत रस्ते कॉकिटीकरण करणे 20 लक्ष., नुने अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लक्ष., सैदापूर अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लक्ष., भाटमरळी अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लक्ष., सैदापूर येथे गणेश कॉलनी अंतर्गत मनोहर कुर्लेकर घरासमोर रस्ता करणे 8 लक्ष., सैदापूर सातारा मेढा रस्ता ते माळवाडी पोहोच रस्ता करणे 10 लक्ष., कोंदणी अंतर्गत रस्ता कांजाई मंदिर काँक्रिटिकरण व डांबरीकरण करणे 10 लक्ष., बेन्डवाडी येथे स्मशानभूमी शेड बांधणे 7 लक्ष, कुसवडे अंतर्गत रस्ता काँक्रिटिकरण व डांबरीकरण करणे 10 लक्ष., कुमठे अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लक्ष., यवतेश्वर रस्ता काँक्रिटिकरण व डांबरीकरण करणे 10 लक्ष., पिलाणीवाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटिकरण व डांबरीकरण करणे 10 लक्ष., राकुसलेवाडी जानाई मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, कुरुळवाजी अंतर्गत रस्ते करणे 10 लक्ष., सावली अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 10 लक्ष., कारी बेडेकरवाडी रस्ता करणे 10 लक्ष, अंबवडे खुर्द येथे सातारा-परळी- सज्जनगड रस्ता ते भैरवनाथ मंदिरपर्यंत रस्ता काँक्रिटिकरण व डांबरीकरण करणे 10 लक्ष., करंजे तर्फ परळी अंतर्गत रस्ता करणे 10 लक्ष, वावदरे येथे अंतर्गत रस्ता करणे 10 लक्ष., कारी बेडेकरवस्ती अंतर्गत रस्ता करणे 10 लक्ष., ताकवली येथे संरक्षक भिंत बांधणे 10 लक्ष., कारी करंडी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे 15 लक्ष., केळवली ते दत्तवाडी रस्ता करणे 20 लक्ष, कुडेघर अप्रोच रस्ता डांबरीकरण करणे 15 लक्ष., खडगाव अंतर्गत रस्ता करणे 20 लक्ष., कुस खुर्द अप्रोच रस्ता डांबरीकरण करणे 10 लक्ष, आंबेवाडी अप्रोच रस्ता डांबरीकरण करणे 10 लक्ष., वडगाव येथे पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लक्ष., कुस खुर्द सभामंडप उर्वरित काम करणे 10 लक्ष, शेंद्रे अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 15 लक्ष., शेळकेवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 15 लक्ष., सोनगाव तर्फ सातारा अप्रोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 15 लक्ष., सोनवडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे 20 लक्ष इत्यादी कामांचा समावेश आहे.

Related Stories

म्हाते-सावली पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद

datta jadhav

साताऱयात 500 मुस्लिम बांधवांनी केले रक्तदान

Patil_p

जातीच्या संघटनांनी आर्थिक प्रश्नावर लढले पाहिजे, अभाम महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचं मत

Kalyani Amanagi

जिल्हा नियोजन समितीमार्फत नगरोथ्थानमधुन 12 कोटी 64 निधी

Patil_p

जिल्ह्यात 50 नवे बाधित

datta jadhav

जलपर्णीच्या नावाखाली बेकायदा वाळू उपसा थांबवा अन्यथा आमरण उपोषण

Archana Banage