Tarun Bharat

गंगा नदी काठावर ५ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

गंगा नदीच्या (ganga river) किनारी गुरुवारी सकाळी एकाच वेळी पाच जणांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिहारच्या बक्सर जिल्ह्यात (baksar district bihar) गंगा नदीच्या किनारी हे पाच अज्ञान व्यक्तींचे मृतदेह आढळले. तर एकाच वेळी इतके मृतदेह नाथ बाबा घाटावर आढळल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिहारच्या बक्सर जिल्ह्यात गंगा नदीच्या किनारी असलेल्या नाथ बाबा घाटावर पाच मृतदेह आढळले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून लोकांनी नदी किनारी गर्दी केली आहे. मृत व्यक्तींपैकी एक महिला असून इतर चार पुरुष आहेत. हे मृतदेह कुठून आले याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

कोरोना काळात गंगा नदीच्या किनारी मृतदेहावरून गेल्या वर्षी बरीच चर्चा झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १० मे २०२१ रोजी एकाचवेळी चौसा प्रखंड इथल्या महादेव घाटावर अनेक मृतदेह तरंगताना आढळले होते. त्यावरून कोरोना मृतांची संख्या लपवल्याचे आरोपही केले गेले होते. गंगा नदीत आढळलेल्या मृतदेहावरून भाजपवर विरोधी पक्षाने जोरदार टीका केली होती.

Related Stories

तळीरामांना मिळणार घरबसल्या दारु

Abhijeet Shinde

अंदमान-निकोबारमध्ये भूकंपाचा धक्का

Patil_p

आरोग्याच्या देखभालीसाठी वन निर्मिती

Patil_p

फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?

Rohan_P

अजिंक्यताऱ्याच्या कड्यावरून पाय घसरून वृद्ध दरीत पडला

datta jadhav

अकोला : कोरोना रुग्णांची संख्या 75 वर

Rohan_P
error: Content is protected !!