चंदीगड
पंजाबमधील होशियारपूर येथे शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या एका रस्ते अपघातात पाच तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व लोक कारमधून प्रवास करत होते. जालंधर-पठाणकोट महामार्गावर दसुहाजवळ त्यांच्या कारला ट्रकने मागून धडक दिली. अपघातानंतर कारमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर गाडीने पेट घेतला. कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे पाचही मित्रांना प्राण गमवावे लागले