Tarun Bharat

बनावट दागिने ठेवून बँकेची ५ लाखांची फसवणूक

5 lakh bank fraud by keeping fake jewellery

सिंधुदुर्गात ५ जणांची टोळी ताब्यात

कुडाळ / वार्ताहर:

बनावट सोन्याचे दागिने युको बँकेच्या कुडाळ शाखेत ठेऊन पाच लाख 31 हजार रुपये सोने तारण कर्ज उकळणाऱ्या टोळीला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन महिलांसह पाच जण संशयित असून ते कोल्हापूर जिह्यातील आहेत. यातील एका महिलेचे माहेर वैभववाडी येथे आहे. मुख्य सूत्रधाराने येथून पलायन केले होते. मात्र,कुडाळ पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर येथे जात त्याला ताब्यात घेतले. 12 जानेवारी रोजी सदर रक्कमेची उचल केली असून पुन्हा कर्ज उचल करण्यासाठी शनिवारी सशयित बँकेत आले असता शाखा व्यवस्थापकना सशय आल्याने ही घटना उघडकीस आली. सशयित स्नेहा सज्जन नारकर ( ३१, राजारामपुरी – कोल्हापूर , वैभववाडी (माहेर), वैभवी विष्णू पाटील (२६, हुपरी – कोल्हापूर) ,साई दिलीप कांबळे (२८, रामानंदनगर- कोल्हापूर ) व सौरभ सुभाष गुरव (२४, रामानंदनगर- कोल्हापूर ) या चौघाना कुडाळ पोलिसांनी काल ताब्यात घेत गुन्हा करून अटक केली रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली,तर यातील सूत्रधार वसंत धनाजी पाटील ( 46, रा.हुपरी – कोल्हापूर ) याला आज पहाटे ताब्यात घेतले.त्याला सोमवारी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबतची फिर्याद युको बँक कुडाळचे शाखा व्यवस्थापक नीलेश वसंत भोसले ( मूळ सातारा,सध्या कुडाळ शिवाजीनगर ) यांनी दिली. बारा जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता चस्मानास स्नेहा सज्जन नारकर यांनी युको बँक शाखा कुडामध्ये त्यांचे नावे एकूण 17 तोळे 100 ग्रम वजनाचे खोटे दागिने ठेवून त्याद्वारे पाच लाख 31 हजार रुपये रक्कम त्यांच्या बचत खात्यात स्वीकारून ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरलेली असून त्याद्वारे फसवणूक केली आहे. तसेच काल 21 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास वसंत पाटील यांनी दिलेल्या बनावट सोन्याचे दागिने घेऊन स्नेहा नारकर, वैभवी पाटील साई कांबळे यांनी पुन्हा येऊन 132 ग्रॅम वजनाच्या बांगड्या, 50 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या असे बनावट सोने तारण ठेऊन कर्ज घ्यायचे असल्याबाबत सांगून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. भारतीय दंड संहिता 1960 चे 420, 417 ,34 अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Related Stories

तेरेखोल नदीला महापूर आल्याने ओटवणे दशक्रोशीत पुरस्थिती

Anuja Kudatarkar

कोकणात होणार तीन कासव उपचार केंद्रे!

Patil_p

आशा सेविका सौ.लक्ष्मी परब यांचे निधन

Anuja Kudatarkar

कामवाटप निर्णयाची लवकर अंमलबजावणी करा- बेरोजगार अभियंता संघटनेवतीने निवेदन सादर

Anuja Kudatarkar

दापोली मतमोजणी केंद्रानजिकच्या वहातुकीत बदल

Archana Banage

खाडीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन जोरात

NIKHIL_N
error: Content is protected !!