ऑनलाईन टीम बस्तर
हिंसाचाराच्या आठ घटनांमध्ये आरोपी असलेला आणि डोक्यावर 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्याचा खातमा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले. ही कारवाई छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यातील सुकमा या ठिकाणी करण्यात आली. या संबंधीची माहीती छत्तीसगड पोलिसांनी माध्यमांना दिली.
बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी एका सांगितले की, “राकेश मडकम असे माओवाद्याचे नाव असून तो सीपीआय (माओवादी) गटाच्या काटेकल्याण क्षेत्र समितीचा सदस्य होता. दंतेवाडा जिल्ह्यातील आंतरजिल्हा सीमेवर नक्षलविरोधी मोहिमेवर असलेल्या जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) च्या पथकाकडून ही चकमक केली गेली. ही कारवाई बिंद्रपाणी गावाजवळच्या जंगलात पहाटेच्या सुमारास करण्यात आली.”
अधिक माहीती सांगताना आयजी म्हणाले, “माओवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ढेइन असणाऱ्या सुरक्षा पथकाने गुरुवारी रात्री आंतरजिल्हा सीमेवरील जंगलात हे ऑपरेशन सुरू केले. या कारवाई दरम्यान दंतेवाडा जंगलात दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला.” या गोऴीबारात सुरक्षा दलांनी माओवाद्यांचा खातमा केला. पथकाने माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्याकडील देशी बनावटीचे शस्त्रे जप्त केली आहेत. तीनच दिवसापुर्वी बुद्ध राम मडकम उर्फ महंगू देवा नावाच्या माओवाद्याला यमसदनी धाडण्यास सुरक्षा रक्षकांना यश आले होते. त्याच्याही डोक्यावर ₹ 5 लाखांचे बक्षीस असल्याचे पोलिसांनी सांगितले.